Officials on distribution of symbols for election to Agricultural Produce Market Committee esakal
नाशिक

Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेनेला कपबशी तर सर्वपक्षीय पॅनलला छत्री; उमेदवारांना चिन्हांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलसह अपक्ष उमेदवारांना आज बाजार समितीच्या सभागृहात चिन्ह वाटप करण्यात आले. तीत शेतकरी विकास पॅनलला कपबशी तर शेतकरी समर्थक पॅनलला छत्री हे चिन्ह देण्यात आले आहे. (Cup to NCP Shiv Sena and Umbrella to All Party Panel Allotment of marks to candidates Nashik News)

माजी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, शिवसेना (ठाकरे) नेते संभाजीराजे पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, भाजप नेते बाबा डमाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे,

गोरख पवार आदींच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना (ठाकरे), प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय आदींचा समावेश असलेल्या शेतकरी समर्थक पॅनल अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.

याशिवाय सोसायटी गटातील विलास भालेराव यांना पंखा, दत्तात्रय वैद्य यांना विमान, ग्रामपंचायत गटातील गणेश कोटमे यांना विमान, भाऊसाहेब अहिरे यांना गॅस सिलिंडर, व्यापारी गटातील भरत समदडिया यांना कांदा हे चिन्ह मिळाले आहे.

हमाल तोलारी गटातील दहाही उमेदवारांना वेगळीवेगळी चिन्ह मिळाले आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गट, काँग्रेस या निवडणुकीपासून दूर राहणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे आहेत पॅनल

शेतकरी विकास पॅनल : संजय बनकर, किसन धनगे, मोहन शेलार, संजय पगार, अल्केश कासलीवाल, सविता बाळासाहेब पवार, रतन बोरणारे, लता गायकवाड, पुष्पा शेळके, वसंतराव पवार, कांतिलाल साळवे, ज्ञानेश्वर दराडे, बापू गायकवाड, सचिन आहेर, संध्या पगारे, नंदकिशोर अट्टल, सुरेश अट्टल, गोरख सुरासे.

शेतकरी समर्थक पॅनल : भास्कर कोंढरे, छगन आहेर, नंदकिशोर शिंदे, रमेश शिंदे, श्रावण देवरे, रामदास पवार, बाळू साताळकर, उषा शिंदे, कल्पना कुऱ्हे, हरिभाऊ महाजन, नारायण आव्हाड, महेश काळे, कृष्णा कव्हात, झुंजार देशमुख, प्रल्हाद जावळे, शंकर कदम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT