LPG Cylinder Price Hike esakal
नाशिक

सिलिंडर दरवाढीचा आदिवासी भागात फटका; स्वयंपाकासाठी चुलींना पसंती

शरद भामरे

जुनी शेमळी (जि. नाशिक) : गॅस सिलिंडरचे दर (LPG Cylinder Price Hike) हजारावर भिडल्याने ग्रामीण भागासह आदिवासी भागातील गोरगरीब मध्यमवर्गीयांना सिलिंडरवर स्वयंपाक करणे आता परवडणारे नाही. महिलांनी आता सिलिंडर बाजूला ठेवून चूल (Stoves) पेटविण्यासाठी सरपण गोळा करण्यास प्राधान्य दिले आहे. (Cylinder price hike hits tribal areas Prefer stoves for cooking Nashik News)

जंगलात भटकंती करून डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन साठवणूक केली जाते. चुल पेटविण्यासाठी लाकडे गोळा केली जात आहे. ‘भाऊ सिलिंडर महाग हुई गये, एवढा पैसा कुठून आणाना’ व ‘सबसिडी ही बंद हुई गयी’ यापेक्षा आपली लाकडावरील चुल चांगली अशी म्हणण्याची वेळ गोरगरीब महिलांवर आली आहे. सद्यस्थितीत कुटुंबाचा स्वयंपाक करण्यासाठी सिलिंडरमध्ये गॅस नाही. सबसिडीही (subsidies) मिळत नसल्याने रानावनात भटकंती करून लाकडाच्या काड्या गोळा करून मोळी डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागते. ग्रामीण भागात व आदिवासी भागात गरीब महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. मात्र, सिलिंडर दरात मोठी वाढ झाल्याने आर्थिक बजट बिघडले. ग्रामीण भागात महिला चुलीकडे वळल्या आहेत. महिनाभरातच दर एक हजार रुपयांपर्यंत पोहचल्याने एवढी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

"शासनाने उज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत सिलिंडर दिले. मात्र, गॅसचे दर एक हजार रुपयांपर्यंत गगनाला भिडल्याने व सबसिडीही मिळत नसल्याने मोलमजुरी करणाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे रानावनात भटकंती करून डोक्यावर सरपण आणले जात आहे."
- उज्ज्वला निकम, गृहिणी, किरातवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT