Shiv Sena District Chief Sanjay Dusane, Municipal Chief Vinod Wagh, former Chairman of Market Committee Rajendra Jadhav etc. while giving information in a press conference here. esakal
नाशिक

Advay Hire Arrest Case: अद्वय हिरेंच्या अटकेमध्ये दादा भुसेंचा सहभाग नाही; शिवसेनेतर्फे माहिती

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला डबघाईस आणण्यात तत्कालीन अध्यक्ष अद्वय हिरे यांचा वाटा आहे. त्यांनी पद, अधिकाराचा दुरुपयोग करून रेणुका सूतगिरणीस तीन टप्प्यात ७ कोटी ४६ लाखाचे कर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांचा शेरा विरोधात असताना मंजूर करून घेतले.

शासनाने लेखा परीक्षक, न्यायालय, संविधान व कायद्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे. या प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांचा कुठलाही सहभाग नाही.

पालकमंत्र्यांवर नाहक चिखलफेक सहन केली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख विनोद वाघ, उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत दिला. (Dada Bhuse not involved in Advay Hire arrest Information by Shiv Sena nashik)

द्याने शिवारातील रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रांगणात ही पत्रकार परिषद झाली. श्री. दुसाने, श्री. वाघ म्हणाले,‘ जिल्हा बँक बुडविणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही. पालकमंत्र्यांवर टीका खपवून घेणार नाही.

अद्वय हिरे यांचे गैरकारभार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. आगामी काळात पालकमंत्र्यांवर आरोप केल्यास जशास तसे उत्तर देवू असा इशारा दिला. जिल्हा बँकेने या कर्जप्रकरणी वारंवार नोटिसा दिल्या.

संबंधितांनी दाद दिली नाही. वसुली मोहीम जोमाने राबविण्याचे सुरु झाल्यानंतर ही कारवाई झालेली आहे. यात शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही. श्री. दुसाने, वाघ यांनी या कर्ज प्रकरणासह कारवाईची सविस्तर माहिती दिली.

अनेक त्रुटीचे निष्कर्ष बँक अधिकाऱ्यांनी नोंदविले होते. त्यांचे शेरे डावलून मनमानी पध्दतीने कर्ज मंजूर करून घेतले. लेखा परीक्षकांनी श्री. हिरे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आक्षेप नोंदविला.

मालेगाव न्यायालय व उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर हिरे यांना अटक झाली. यात शिवसेनेचा संबंध काय? याउलट आगामी काळात सामान्य जनतेचे पैसे लुबाडणाऱ्या, नोकरीच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होतील.

बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव, माजी पंचायत समिती सभापती धर्मा पवार, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम, माजी नगरसेवक तानाजी देशमुख, नीळकंठ निकम, ताराचंद बच्छाव, चंद्रकांत अहिरे, यशपाल बागूल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT