Dada Bhuse esakal
नाशिक

Dada Bhuse News: दाभाडीत ट्रामा केअर सेंटरला मंजुरी : दादा भुसे

General Hospital at Malegaon.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहर व तालुक्याचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार व विकास होत आहे. त्याच तुलनेत विकास कामेही होत आहेत. शहर व तालुकावासीयांना दीपावलीच्या निमित्ताने राज्य शासनाने मोठी भेट दिली.

शहरातील सामान्य रुग्णालयात २०० खाटाहून ३०० खाटांना मंजुरी देत रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले.

दाभाडी (ता. मालेगाव) येथील ग्रामीण रग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मंजुरी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. (Dada Bhuse statement Approval for trauma care center in Dabhadi nashik)

श्री. भुसे सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व दाभाडी ट्रामा केअर सेंटरसाठीही ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना मंगळवारी (ता.३१) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यश आले.

श्रेणीवर्धन व ट्रामा केअर सेंटरमुळे शहर व तालुक्यातील नागरिकांना आगामी काळात आरोग्य सेवेसाठी मोठा फायदा होणार आहे. शहरातील मोसम पुल परिसरातही यापूर्वी महिला व बाल रुग्णालय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.

द्याने येथेही प्रधानमंत्री जनविकास योजनेतून रुग्णालयाचे काम सुरु आहे. या कामांसह महानगरपालिकेचे वाडिया व अली अकबर रुग्णालयाचे नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहर व तालुका आरोग्य सेवेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.

दाभाडी येथील ग्रामीण रग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्याची मागणी श्री. भुसे यांनी शासन दरबारी लावून धरली होती. या मागणीचा पाठपुरावा करून शासनाच्या विचाराधीन असलेला हा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत मंजूर झाला.

शासन निर्णयात ग्रामीण रुग्णालय, दाभाडी येथे २० खाटांचे ट्रामा केअर सेंटरची स्थापना करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. या सेंटरसाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे बाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धनसह रुग्णालयाचे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत आदेश पारीत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT