Guardian Minister Dada Bhuse speaking at the district level Kharif season planning meeting at Nijojang Bhawan on Monday esakal
नाशिक

Kharif Review Meeting : पाऊस लांबल्यास खरीप पीक पेरणीत बदल : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Kharif Review Meeting : यंदाच्या खरिपासाठी सहा लाख २७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यंदा पाऊस लांबण्याचे अंदाज वर्तविले जात असल्याने लांबणाऱ्या पावसानुसार ऐनवेळी पीकपद्धतीत बदलांच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत. (Dada bhuse statement at Kharif Review Meeting Change in sowing of Kharif crop if rains prolonged nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (ता. ८) खरीप आढावा बैठक घेण्यात आली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, प्रवीण पवार, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस लांबला तर बदलानुसार पीकपद्धत बदलावी. यंदा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.

यापुढे तालुकास्तरावरच प्रस्तावांना मान्यता दिली जाणार आहेत. यंदाचे वर्ष पौष्टिक कडधान्य वर्षे म्हणून साजरे होणार आहे. त्यात विविध उपाययोजनांसह सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन आहे.

सततच्या गारपिटीने नुकसान झालेल्यांना सानुग्रह अनुदान मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच एक हजारांहून कमी भरपाई असलेल्यांना शासनाचा हिस्सा आल्यानंतर मदत दिली जाणार असल्याचे कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बागा वाचविण्यासाठी उपाययोजना

पाऊस लांबला तर बदलानुसार पीकपद्धत बदलावी. आंतरपिकांचा अधिक वापर व्हावा. २० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर वाढणार आहे. तर रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्क्यांच्या आसपास घट करावी लागेल.

कपाशीत ओळीची संख्या कमी करून त्यात एक-दोन तुरीच्या ओळी घेण्याचे सुचविले आहे. बागा वाचविण्यासह आच्छादनाचा वापर वाढविण्यासह विविध उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहिती देताना, मागील वर्षीच्या मार्चपासून साधारण तीन लाख २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे ३३५ कोटींचे नुकसान झाल्याने मदतीसाठी मागणी केली होती.

त्यानुसार ऑगस्टपर्यंत नुकसान झालेल्यांना मदत देण्यात आली आहे. पीकविमा योजनेत एक लाख ६३ हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहिला. त्यातील ६३ हजार ७८२ शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना नोंदविल्या.

आतापर्यंत १९ कोटी २६ लाखांची भरपाई दिली गेली आहे. नऊ हजार ७९० शेतकऱ्यांच्या दोनदा नोंदी होत्या, तर विमा उतरविलेला नसताना तीन हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

- यंदाचे वर्षे पौष्टिक कडधान्य वर्षे साजरे होणार

- यंदा एक रुपयांत शेतकऱ्यांना विमा उतरविणार

- दोन लाख ६० लाख टन खत उपलब्ध

- सोयाबीन वगळता ६८ हजार क्विंटल बियाणे

२०२३-२४ प्रस्तावित नियोजन

पीक प्रस्तावित क्षेत्र हेक्टरीत

भात ९२ हजार २३८

बाजरी ७८ हजार ७७७

ज्वारी दोन हजार ३४०

नागली १७ हजार ७४७

मका दोन लाख २८ हजार ३४२

तूर पाच हजार ८४४

मूग २० हजार ३७०

उडीद सहा हजार ४३

भुईमूग २३ हजार ४१५

कारळे एक हजार ८४८

सोयाबीन एक लाख १३ हजार २०७

कापूस ३६ हजार ९७०

-----

एकूण खरीप सहा लाख २७ हजार एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT