nayab 23.jpg
nayab 23.jpg 
नाशिक

"भोळ्या भाबड्या आईबापाला तहसीलदार काय असतो हेही माहीत नव्हतं..." पण आज लेकानं करून दाखवलचं! 

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / दहीवड : ठक्कर बिल्डर्सकडे वडीलांच वॉचमनचं काम करतात.आईचं चार घरची धुणीभांडी करते..घरची हलाखीची परिस्थिती. आई वडील दोन्ही निरक्षर.. शालेय वयात क्रिडा स्पर्धांत खो खो मध्ये खेळायचा..त्यानंतर रनिंगकडे वळला.. कविता राऊतने त्याला पळताना पाहिले. तिने त्याला पाच ते सहा वर्ष विजेंद्र सिंग यांचे कडे प्रशिक्षण दिले. धावण्याची आवड पण घरची बिकट परिस्थिती, मग त्याने मॅरेथॉनकडे मन वळवले.. त्यातून मिळणारे बक्षिसे ऊर्जा देत असत..नंतर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला. या कालावधीत त्याला पायाला दुखापत झाली आणि तो खेळापासून दुरावला गेला. यादरम्यान त्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. पण लहानपणापासून धावण्याची आवड असल्याने त्याने धावण्याच्या ट्रॅक बाजूला करत स्पर्धा परीक्षेचा एक ट्रॅक तयार केला आणि पहिल्या प्रयत्नात नायब तहसीलदार झाला. दत्ता हरिभाऊ बोरसे याची ही यशोगाथा...

निरक्षर आई बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू! लेक नायब तहसीलदार.

मूळचा खडकी (ता.पेठ) या आदिवासी क्षेत्रातील परंतु सध्या नाशिकच्या मनोहर नगर (गोविंद नगर) मध्ये राहणारा दत्ता बोरसे हा एक सर्व साधारण मुलगा. आई वडील दोन्हीही निरक्षर. वडाळा गावात महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला, त्यानंतर पेठे शाळेत, भोसला मिल्ट्री स्कुल मध्ये 11वी-12 वी चे शिक्षण पूर्ण केले. केटीएचएम कॉलेज मधून बीए व एमए चे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून धावण्याची आवड असलेल्या दत्ताने शालेय स्तरावर खो खो च्या स्पर्धा रंगवल्या. त्यानंतर त्याने मॅरेथॉनकडे वळत बक्षीसे गोळा करायला सुरुवात केली. पाहता पाहता आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला अनेक पदकांना त्याने गवसणी घातली. एमए चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पायाला दुखापत झाली आणि एकदाचे धावणेच थांबले. अशातच त्याने ट्रॅक चेंज करत एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. हा अभ्यास करताना त्याला खुप आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अभ्यास सुरू असताना तीन ते चार हजारावर पार्ट टाईम क्रीडा शिक्षक व फिटनेस ट्रेनरचं काम केलं. हे काम व अभ्यास सुरू असताना मंत्रालयात लिपिक पदावर निवड झाली परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिथल्या नेमणुकी संदर्भातील कुठलेही नियुक्ती बाबतचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे दत्ताचा प्रत्येक दिवस तणावात जायचा.

आणि अपेक्षित यश प्राप्त झाले.

लॉकडाउनच्या काळात त्याला रोजंदारीचे काम शोधावं लागलं. नाक्यावर कामाला जाऊन तेथील टाक्या साफ करणे हे काम त्याने केले. 2019 च्या जुलै महिन्यात अनुसूचित जमातीच्या संवर्गातून क्रीडाविभातून दिलेली एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.19) रोजी लागला त्यात दत्ता नायब तहसीलदार झाला. एका खेळाडूला जेव्हा दुखापत होते तेव्हा तो त्या आर्थिक संकटांचा कसा सामना करतो ते दत्ताने जवळून अनुभवलंय. ह्या दुखापतीच्या काळात वजन वाढले, ग्राउंड परफॉर्ममन्स कमी झाला. खेळापासून दत्ताचे एक अंतर निर्माण होत गेले. रेल्वे, आर्मीच्या स्पोर्टच्या रिक्त जागा असतात पण दत्ताला पायाला दुखापत झाल्यामुळे तो त्यासाठी पात्र नव्हता. पोलीस भरतीला जाण्याचा विचार केला तर त्यात उंची कमी यायची अशा एक ना अनेक समस्या तोंडासमोर होत्या. मध्यंतरीच्या काळात टीका होऊ लागल्या की आंतरराष्ट्रीय खेळाडू होता, त्याला नोकरी नाही आहे. ह्या समस्यांचा जास्त विचार न करता दत्ताने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि अपेक्षित यश प्राप्त झाले.

आई वडिलांना तहसीलदार काय असतो हेही माहीत नव्हतं...!

"आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे नेहमी विविध पदके घेऊन येणारा दत्ता पेढे घेऊन आला आई वडिलांना वाटलं की ह्यावेळेसही एखादं पदक मिळालं असेल. पण जेव्हा निकाल लागल्यानंतर घरी मित्रांची गर्दी होऊ लागली तेव्हा मित्रांनी दत्ताच्या आई वडिलांना नायब तहसीलदार म्हणजे तर तालुक्याचा अधिकारी सांगितलं तेव्हा त्यांचे डोळे पाणावले."

आयुष्यामध्ये संयम खूप महत्त्वाचा

ह्या यशामुळे माझ्या आयुष्याला नक्कीच एक कलाटणी मिळेल आणि खेळाडू मुलांना स्पर्धा परीक्षेत खूप संधी आहे.खेळाडूंनी आपल्या आयुष्यत अभ्यासाला पण महत्त्व दिले पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती वर मात करता येते आयुष्यामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. - दत्ता बोरसे, नाशिक
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT