deola onion nuksan.jpg 
नाशिक

देवळा तालुक्यात कांद्याचे नुकसान; बुरशी, मावा व करप्या रोगाचे आक्रमण

अनिल सावंत

महालपाटणे (जि.नाशिक) : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून देवळा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावल्याने येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदारोप व कांद्याच्या पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बुरशी, मावा व करप्या रोगाचे आक्रमण
देवळा, गुंजाळनगर, सुभाषनगर, भावडे, कापशी, वाखारी, खुंटेवाडी, पिंपळगाव, मेशी, महालपाटणे, देवपूरपाडे, रणादेवपाडे, निंबोळा आदी गावांमध्ये परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. सध्या खरिपाच्या पिकांची कापणी सुरू आहे. गेल्या पंधरवड्यात अशाच पद्धतीने जोरदार पाऊस झाल्याने बाजरीचे पीक आवरताना शेतकऱ्यांचा चारा शेतातच सडला, आता उरलासुरला मका पदरात पाडून घेण्याची लगबग सुरू आहे. परंतु रोज पाऊस येत असल्याने हेही पीक हातचे जाते की काय, अशी अवस्था आहे. तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा ओळखला जातो. मात्र जास्त पावसाने कांद्याचे पीक जमीनदोस्त झाले असून, संपूर्ण तालुक्यातील कांदा पिकावर बुरशी, मावा व करप्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे कांदा यंदा तरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी
आधीच शेतकऱ्यांकडे व कंपनीकडे कांदा बियाणे शिल्लक नाही. दोन-तीनदा कांदा उळे टाकल्यावरही अतिवृष्टीने ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. यंदा सगळीकडे विक्रमी पाऊस आहे. पण त्यामानाने शेतीचे उत्पन्न नसल्याने बळीराजा दुःखी आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

पूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

माझ्या दोन एकर शेतात दीड महिन्यापूर्वी लाल कांदा लावला. अतिशय प्रतिकूल हवामानात उळे टाकण्यापासून, तर आतापर्यंत कांद्याची काळजी घेतली. परंतु सध्या कोसळणाऱ्या पावसाने पूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, एवढीच अपेक्षा.- 
भगवान जाधव (राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, सुभाषनगर, ता. देवळा) 

संपादन - ज्योती देवरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China Border: अरुणाचल प्रदेशात चीनची घुसखोरी? सैन्य ४० ते ५० किलोमीटर आत शिरल्याचा काँग्रेसचा दावा

Floating Solar Project: ‘मुळशी’त उभारणार तरंगता सौर प्रकल्प ;टाटा पॉवरची नॉर्वेजियन कंपनीशी भागीदारी

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

SCROLL FOR NEXT