Damage to pomegranate orchards due to heavy rains ESAKAL
नाशिक

वादळी पावसाने डाळिंबाग भुईसपाट

डाळिंब बागेतील शंभरहुन अधिक झाडे उन्मळून पडली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी (ता. ८) सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसाने अर्धा तासातच नागरिकांची दैना उडवली. मुंगसे येथील मुक्ताबाई सूर्यवंशी व पोपट सूर्यवंशी यांच्या डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डाळिंब बागेतील शंभरहुन अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. श्री. सूर्यवंशी यांच्या घराशेजारील चाळीस वर्षाचे लिंबाचे झाड देखील जोरदार वाऱ्याने उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले. पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने मुंगसे व कौळाणे परिसरातील आणि शेतीतील मोठमोठी झाडे मोडून पडली. कौळाणे शिवारातील मुक्ताबाई सूर्यवंशी यांच्या गट नं. १७६ मधील दोन एकर डाळिंब बागेतील झाडे उन्मळून पडली. बहार असल्याने व जोराचा वारा असल्याने अनेक झाडे जमिनदोस्त झाली. परिसरात अनेक वीजचे खांब वाकले आहेत. तर मोठे निंब, बाभळीची झाडे मुळासकट उपटून पडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today : चांदी दराचे सगळे रेकॉर्ड मोडणार? तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारात अस्थिरता राहणार

Pune Crime News : पुरोगामी पुण्यात धक्कादायक प्रकार ! जीन्स घातली म्हणून सासू, दीर अन् मुलीकडून विधवेला बेदम मारहाण, हात मोडला अन्...

Latest Marathi News Live Update : अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Stock Market Today : नवीन वर्षात शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; TVS Motors चर्चेत; कोणते शेअर्स वाढले?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार

SCROLL FOR NEXT