khajur.jpg 
नाशिक

ऐन रमजानपर्वात मंदावला खजूर बाजार... विक्रीवर मोठा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रमजान पर्वात खजुराला सर्वाधिक मागणी असते. यंदा मात्र कोरोनामुळे खजूर विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. "लॉकडाउन'मुळे माल बाजारात येत नसल्याने केवळ 10 ते 20 टक्के खजूर विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती विक्रेत्याने दिली.

यावर्षी केवळ 10 ते 20 टक्के खजुराचा व्यवसाय

रमजान पर्वात दर वर्षी शंभर टक्के व्यवसाय होतो. मात्र यावर्षी केवळ 10 ते 20 टक्के खजुराचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगण्यात आले. दर वर्षी सुमारे 50 पेक्षा जास्त प्रकारचा खजूर बाजारात येतो. यंदा पाच ते सहा प्रकारचा खजूर विक्रीसाठी आला आहे. "लॉकडाउन'मुळे इतर राज्यांतून किंवा जिल्ह्यांतून माल येत नाही. डिसेंबर- जानेवारीत काही विक्रेत्यांनी मालाचा साठा करून ठेवला होता. त्याच मालाची सध्या विक्री होत आहे. नवीन माल येण्याचे मार्ग नसल्याने येत्या काही दिवसांत आहे, तो माल संपून दुकान बंद करण्याची वेळ येणार असल्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

विमानसेवा बंद असल्याने नुकसान
सौदी अरब, इराण, इराक अशा विविध ठिकाणांहून खजुराची आयात केली जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत. शहरातील विक्रेत्यांनी इतर ठिकाणी करून ठेवलेला साठाही "लॉकडाउन'मुळे विक्रीस आणणे शक्‍य होत नाही. मालेगावची खजूर शहरात विक्रीस आल्याच्या वृत्ताने पोलिसांकडून चार दिवस दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीने खरेदीचे प्रमाण घटले आहे. रतब रसगुल्ला, रतब मुजाफाती, मदिना कलमी, अंबर, मरियम, अंगुरी, कच्ची-पक्की (साधी) अशा विविध खजुराच्या प्रकाराची विक्री होत आहे.

"यंदा खजुराच्या विक्रीवर मोठा परिणाम

लॉकडाउन'मुळे सर्वच व्यवसाय, उद्योग बंद आहेत. सध्या नागरिकांकडे पैसा नाही. शिवाय मालेगावची खजूर आणि "लॉकडाउन'च्या भीतीने शहराच्या अन्य भागांतील नागरिक खरेदीस येत नसल्याने यंदा खजुराच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.- याकूबअली सय्यद, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT