Datta Jayanti 2022 esakal
नाशिक

Datta Jayanti 2022 : अंबासनला खंडेराव महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी; 4 दिवस चालणार यात्रा

सकाळ वृत्तसेवा

अंबासन : गावाजवळील झुळझुळ वाहणारी मोसम नदी...त्यातच सर्वत्र हिरवेगार रान...डोंगर पायथ्याशी वसलेले गाव अंबासन, डोंगरावरील ग्राम दैवत खंडेराव महाराज यांची अखंडित वर्षानुवर्षे सुरू असलेला यात्रोत्सव सुरू होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.यात्रोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशा व मोसम तीरावर भव्य कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. यानिमित्त यात्रोत्सवात पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील भाविक, मल्ल सहभागी होत असतात.

‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा जयघोषात येथील खंडेराव महाराजांचे भक्त भंडाराची उधळण करीत वाजतगाजत गावातून मांडव व काठीची मिरवणूक काढतात. पहाटेपासून डोंगरावरील खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी रिग लागलेली असते. मंदिराला ग्रामपंचायत प्रशासनाकडून नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली असून संपूर्ण मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध वस्तूंची शेकडो दुकाने थाटली जातात.

दत्त जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (ता.७) सायंकाळी शालिक शांताराम यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून गुरुवारी (ता.८) मोसम नदीकाठावर भव्य कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार आहे. यात्रोत्सवात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच राजसबाई गरुड, उपसरपंच शरद कोर, विजय गरुड, शशिकांत कोर, भीमाबाई भामरे, मंगलबाई कोर, भाऊसाहेब भामरे, शैलेंद्र कोर, पूजा बोरसे, स्वाती आहिरे, रंजनाबाई आहिरे यांनी केले आहे.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

''सालाबादाप्रमाणे यंदा यात्रेत सर्वाधिक भाविक येण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियोजन केले आहे. तसेच, व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही यात्रोत्सवात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.''

-शरद कोर, उपसरपंच, अंबासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बागेश्वर धाम'मध्ये मोठी दुर्घटना! मंडप कोसळल्याने भाविकाचा मृत्यू, 10 जण जखमी; धीरेंद्र शास्त्रींच्या वाढदिवसाला आले होते लोक

Latest Maharashtra News Updates : अमरावतीत उड्डाणपुलावर भीषण अपघात; टँकरच्या धडकेत महिलेने गमवावा जीव

Hotel Bhagyashree: आता हे काय? "अबकी बार तुळजापूर विधानसभा करणार पार …"; हॉटेल भाग्यश्रीचा मालक आमदार होणार?

High Court : अवैध बांधकामासाठी ठोठावलेला दंड जमा; न्यायालयात याचिकाकर्त्याची माहिती, निधीचा वापर पशू कल्याण, आरोग्यासाठी

Ashadhi Wari 2025: 'तृतीयपंथीची जोगव्यातून वारकऱ्यांची सेवा'; पळशीतील रवी ऊर्फ सरस्वती यांचे अनोखे दातृत्व; झुणका भाकरीचा खास बेत

SCROLL FOR NEXT