Dead Leopard esakal
नाशिक

Nashik Leopard News : मिरगाव येथे कांद्याच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह

बिबट्या हालचाल करत नसल्याने हिम्मत धरत काही तरुण जवळ गेले असता तो मृत झाल्याचे आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भिमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर 138 मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते.

शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली. (Dead body of leopard found in onion field in Mirgaon sinnar Nashik News)

हातातली कामे सोडून सर्वजण दूर पळाले. मात्र बिबट्या हालचाल करत नसल्याने हिम्मत धरत काही तरुण जवळ गेले असता तो मृत झाल्याचे आढळून आले.

याबाबत स्थानिकांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक पारस वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपाल अनिल साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर नारायण वैद्य, रामनाथ आगिवले, संतोष मेंगाळ यांनी बिबट्याचा मृतदेह नांदूर शिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात हलवला.

तेथे मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या नर बिबट्याचे वय पाच वर्ष होते. अन्नातून विषबाधा झाल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. नांदूर शिंगोटे वनक्षेत्रात या बिबट्यावर वनविभागाच्या संकेताप्रमाणे अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT