leopard Dead Body Found in river latest marathi news esakal
नाशिक

वडगाव सिन्नर येथे देवनदी पात्रात बिबट्याचा मृतदेह

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वडगाव सिन्नर शिवारात देव नदीवरील बंधाऱ्यात आज दि.21 सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मादी बिबट्याचा (Leopard) पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह (Dead Body) आढळून आला. (Dead body of leopard in Dev river at Vadgaon Sinnar nashik Latest Marathi News)

गेल्या आठवड्यात देव नदीला आलेल्या पुरामुळे वडगाव सिन्नर येथील निफाडी बंधारा ओसंडून वाहत आहे. आज सकाळी गावातील नागरिक सद्दाम शेख हे महावितरणच्या वीज उपकेंद्रा जवळील नदीपात्राकडे गेले असता त्यांना बंधाऱ्यातील पाण्यावर तरंगत असलेला बिबट्याचा मृतदेह दिसला.

याबाबत त्यांनी उपसरपंच संदीप आढाव, पोलीस पाटील मीरा पेढेकर यांना माहिती दिली. श्री. आढाव यांनी वनविभाग व सिन्नर पोलीस ठाण्यात फोन करून बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे कळवले.

सिन्नरच्या वनपरिक्षेत्र (वन्यजीव) अधिकारी मनीषा जाधव, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक तरुणांच्या मदतीने बंधाऱ्यात नदीपात्रालगत तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दोन ते तीन दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा व पाण्यासोबत मृतदेह बंधाऱ्यात वाहून आला असल्याची प्राथमिक शक्यता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवली. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह मोहदरी येथील वनविद्यानात नेण्यात आला.

तेथे शवविच्छेदन केल्यानंतर वनविभागाच्या इतमामात मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वन रक्षक सुजित बोकडे यांनी दिली. सदर बिबट्या मादी तीन ते चार वर्षांची पूर्ण वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT