JEE-Main-1200-1.jpg 
नाशिक

जेईई मेन्‍सच्‍या अर्जासाठी शनिवारपर्यंत मुदत; विद्यार्थ्यांसाठी 'ही' संधी उपलब्ध

अरुण मलाणी

नाशिक : जॉइंट एन्ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२१ परीक्षेची नोंदणीप्रक्रिया अंतिम टप्प्‍यात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीमार्फत घेतल्‍या जाणाऱ्या या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत शनिवार (ता. १६)पर्यंत आहे. निर्धारित शुल्‍क रविवार (ता. १७)पर्यंत ऑनलाइन स्‍वरूपात भरता येणार आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत चार वेळा ही परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असेल. 

फेब्रुवारी ते मेदरम्‍यान चार वेळा परीक्षेची विद्यार्थ्यांना संधी 

आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा द्यावी लागते. यंदा कोविडमुळे चार वेळा ही परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना चारही परीक्षांना प्रविष्ट होण्याची संधी असेल. अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी बी. ई., बी. टेक करिताची जेईई मेन्‍स परीक्षा ऑनलाइन स्‍वरूपात संगणकावर घेतली जाईल. बी. आर्क. आणि बी. प्‍लॅनिंगसाठीच्या जेईई मेन्‍स परीक्षेत लेखी पेपर व ड्रॉइंगवर आधारित पर्सेंटाइल असतील. इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षेत २०१९, २०२० मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी किंवा २०२१ च्‍या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासंदर्भात चार विकल्‍प द्यावे लागतील. या विकल्‍पांपैकी एक शहर देण्याचा एनटीएतर्फे प्रयत्‍न केला जाईल. उमेदवारांना एकापेक्षा जास्‍त सत्रात परीक्षा देताना परीक्षा केंद्रासाठीच्‍या शहराचा पर्याय वेगवेगळा निवडण्याची मुभा असेल. 

जेईई मेन्‍सच्‍या तारखा अशा
  
* २३ ते २६ फेब्रुवारी 
* १५ ते १८ मार्च 
* २७ ते ३० एप्रिल 
* २४ ते २८ मे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

Mass Marriage Ceremony : आख्खा गावात लगीन घाई, गावाला आले यात्रेचे स्वरूप; निमगावात सात जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरात रिकव्हरी एजंटकडून ग्राहकाला बेदम मारहाण

Kolhapur Crime News, : 'माझ्या मुलाला फाशी द्या..'; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद सनदीच्या वडिलांनी मागितली गावकऱ्यांची माफी

पोलिसांवर आली 'धक्का' मारण्याची वेळ! कैद्यांनी भरलेली बस भररस्त्यात पडली बंद अन्...

SCROLL FOR NEXT