11th Admission esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावीच्‍या चौथ्या विशेष फेरीत सहभागाची उद्यापर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चौथी विशेष फेरी अंतिम फेरी असल्‍याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी बुधवार (ता. २३) पर्यंत मुदत असणार आहे. (deadline for participation in 4th special round of 11th is till tomorrow nashik news)

तर शनिवारी (ता.२६) गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

याअंतर्गत यापूर्वी तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरीदेखील जागा रिक्‍त असल्‍याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम संधी उपलब्‍ध करण्याच्‍या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे चौथी विशेष प्रवेश फेरी राबविली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यापूर्वी नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नव्‍याने नोंदणी करणे, तर नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरून प्राधान्‍यक्रम व महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची संधी उपलब्‍ध असेल. त्‍यासाठी बुधवारपर्यंत मुदत दिलेली आहे.

अवघ्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली असून, रिक्‍त जागांची संख्या सुमारे दहा हजार इतकी आहे. फेरीसाठी शनिवारी (ता. २६) गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ ऑगस्‍टपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT