vilas devre farmer.jpg 
नाशिक

दुर्दैवी! पत्नीच्या डोळ्यादेखत घडत होते सौभाग्याचे मृत्यूतांडव; हतबल पत्नीचा आक्रोश

रोशन खैरनार

नाशिक / सटाणा : विलास देवरे मळ्यात वास्तव्यास होते. शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास प्रचंड पाऊस झाला. या पावसात त्या हतबल पत्नीच्या डोळ्यादेखत त्याच्या सौभाग्याचे मृत्यूतांडव सुरु होते. 

अशी घडली घटना

पारनेर (ता. बागलाण) येथील विलास देवरे त्यांच्या ढोलबारे-पारनेर रस्त्यावरील शेवडी मळ्यात वास्तव्यास होते. शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास भीज पावसामुळे त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली व भिंतीच्या ढिगाऱ्याखाली ते दाबले गेले. त्यांच्या पत्नीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाज देत बोलावले व स्वतः मातीचा ढिगारा उपसण्यास सुरवात केली. ढिगाऱ्याखालून जखमी अवस्थेत त्यांना बाहेर काढले असता, त्यांच्या पाठीचा मणका व बरगड्यांची मोडतोड झाल्याने त्यांना असह्य वेदना होत होत्या. रक्तस्रावही जास्त झाल्याने जखमी अवस्थेत त्यांना सटाणा येथील एका खासगी अस्थिरोगतज्ज्ञाकडे दाखल केले असता, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. शेतकरी विलास यशवंत देवरे (वय ५५) यांचा त्यांच्या राहत्या घरी मळ्यात भिंत कोसळून मृत्यू झाला.

शासकीय मदत मिळण्याची मागणी

प्राथमिक उपचारानंतर नाशिकला नेताना त्यांचे रस्त्यातच साडेदहाला निधन झाले. त्यांच्यावर पारनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे निधन झाल्याने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी देवरे कुटुंबीयांनी केली आहे. आदिवासी शासकीय आश्रम विभागाचे निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश यशवंत देवरे यांचे ते लहान बंधू होत.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT