hospitals esakal
नाशिक

शासकीय रुग्‍णालयांतच मृत्‍युदर अधिक

अरूण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीच्‍या (corona virus) दुसऱ्या लाटेत मृतांची (corona second wave) संख्या सुन्न करणारी आहे. या मृत्‍यूंपैकी काही रुग्‍णालयांतील मृत्‍युदर (death rate) अधिक राहिला. ( death-rate-higher-in-government-hospitals)

शासकीय रुग्‍णालयांतील मृत्‍युदर अधिक

१ ते १४ मार्च अशा अडीच महिन्‍यांच्‍या कालावधीत अधिक मृत्‍युदर असलेल्‍या २७ रुग्‍णालयांना साधरणतः १५ मेच्‍या दरम्‍यान नोटिसा बजावल्‍या होत्‍या. यात शासकीय तसेच खासगी कोवि‍ड रुग्‍णालये, कोविड केअर सेंटरचाही समावेश आहे. नमूद कालावधीत मृत्‍युदर अधिक असल्‍याच्‍या कारणांबाबत या रुग्‍णालयांना खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. संबंधित रुग्‍णालय प्रशासन, संचालक यांच्‍या नावाने ही नोटीस बजावली होती. यात अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांच्‍याकडून जिल्‍हा रुग्‍णालयाबाबत, तर नाशिक व मालेगाव महापालिकेचे आरोग्‍याधिकारी यांना त्‍यांच्‍याअंतर्गत येणाऱ्या शासकीय रुग्‍णालयांबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. अडीच महिन्‍यांत कोरोनाचा मृत्‍युदर अधिक असलेल्‍या २७ रुग्‍णालयांना (civil hospitals) जिल्‍हा रुग्‍णालयामार्फत नोटीस बजावत खुलासा मागविला होता. त्‍यानुसार जिल्‍हा रुग्‍णालयातील मृत्‍युदर सर्वाधिक २१.२५ टक्‍के, महापालिकेच्‍या डॉ. झाकीर हुसेन रुग्‍णालयाचा १७.१७ टक्‍के इतका आहे. शासकीय रुग्‍णालयांतील मृत्‍युदर अधिक असल्‍याने सार्वजनिक आरोग्‍य व्यवस्‍थेच्‍या गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्‍ह

दरम्‍यान, नोटीस बजावलेल्‍या रुग्‍णालयांपैकी सर्वाधिक दगाफटका शासकीय रुग्‍णालयांमध्ये बसला असल्‍याचे आकडेवारीतून समोर येत आहे. सहा रुग्‍णालयांमध्ये मृत्‍युदर पाच टक्‍यांपेक्षा अधिक असून, यात चार रुग्‍णालये शासकीय, महापालिकेची आहेत. खासगी रुग्‍णालयांत उपचार घेण्याची आर्थिक क्षमता नसलेले, अत्‍यावस्‍थ रुग्‍ण शासकीय रुग्‍णालयात उपचार घेत असतात. अशा परिस्‍थितीत आकडेवारीचा विचार केल्‍यास रुग्‍णालयात उपलब्‍ध आरोग्‍य सुविधा व सेवेबाबतच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित होत आहे. दरम्‍यान, महापालिका प्रशासनातर्फे शहरातील काही रुग्‍णालयांबाबत कठोर भूमिका घेतली खरी, परंतु मृत्‍युदर अधिक असलेल्‍या रुग्‍णालयांच्‍या यादीत महापालिका प्रशासनाच्‍या दोन रुग्‍णालयांचा समावेश असल्‍याने याबाबत काय भूमिका घेतली जाते, काय उपाययोजना केल्‍या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुंतागुंतीच्‍या रुग्णांमुळे प्रमाण अधिक : शासकीय रुग्‍णालये

शासकीय रुग्‍णालयांत दाखल होणाऱ्या रुग्‍णांपैकी बहुतांश रुग्‍णांची प्रकृती खंबीर असते. रक्‍तातील ऑक्सिजन पातळी (सॅच्‍युरेशन) घटलेले असते. वृद्ध किंवा गंभीर आजारांची पार्श्वभूमी (कोमॉर्बीड) असलेल्‍या रुग्‍णांचेही प्रमाण अधिक आहे. गंभीर स्‍वरूपाच्या रुग्‍णालयांना खासगी रुग्‍णालयात दाद मिळत नाही, अशा रुग्‍णांना शासकीय रुग्‍णालयांतच दाखल केले जाते. उपचार सुरू होण्याअगोदर तर काहींचा उपचार सुरू असताना काही तासांतच मृत्यू होत असल्‍याचा दावा केला जात आहे. तसेच रुग्‍णांना वाचविण्यासाठी डॉक्‍टर व सर्व कर्मचारीवृंद शर्थीचे प्रयत्‍न करतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाच टक्क्‍यांपेक्षा अधिक मृत्‍युदर असलेली रुग्‍णालये

(कालावधी : १ मार्च ते १४ मे)

रुग्‍णालय मृतांची संख्या मृत्‍युदर

जिल्‍हा रुग्‍णालय ४११ २१.२५

डॉ. झाकिर हुसेन रुग्‍णालय ३३२ १७.१७

डॉ. पवार महाविद्यालय-रुग्‍णालय १२३ ६.३६

न्‍यू बिटको रुग्‍णालय ११३ ५.८४

सहारा हॉस्‍पिटल १०७ ५.५३

एसडीएच-येवला १०० ५.१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT