jagtap 1.jpg
jagtap 1.jpg 
नाशिक

डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ  

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : कामाला प्राधान्य देण्यापेक्षा त्यांनी जर आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे वेळीच लक्ष दिले असते व डॉक्टरांचा सल्ला ऐकला असता तर कदाचित आज त्यांचे प्राण वाचले असते? असाच काहीसा दुःखद प्रकार सिडको परिसरात घडल्याची चर्चा ऐकायला मिळत असून त्यांच्या कर्मचारीवर्ग व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कदाचित आज त्यांचे प्राण वाचले असते?

कामटवाडे येथील वीज वितरण उपकेंद्राच्या ठिकाणी महावितरण सहायक अभियंता म्हणून संतोष जगताप गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणाने दिवस-रात्र एक करून काम करीत होते. आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. कर्मचारी वर्गातही त्यांच्या बाबत जिव्हाळ्याचे संबंध होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे हा त्यांचा जणू काही छंदच होता. कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त ग्राहक, सामाजिक कार्यकर्ते व नेते गण यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. म्हणूनच ते मागील अनेक वर्षांपासून कामटवाडे विद्युत उपकेंद्रात टिकून होते. त्यांची बदली होऊ नये म्हणून सर्वच घटकातील लोक प्रयत्न करताना दिसून येत.

परंतु ते त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामटवाडा येथील वीज वितरण उपकेंद्रात हजर झाले. तक्रारींचा निपटारा करताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना कर्मचाऱ्यांनी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याचवेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना ईसीजी करण्यास सुचविले. परंतु ते त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. कामाला प्राधान्य देत ते पुन्हा कार्यालयात उर्वरित काम करण्यासाठी हजर झाले. थोड्या वेळाने एका ठिकाणी जाण्यासाठी आपल्या वाहनचालकाला सोबत घेऊन ते माऊली लॉन्स पर्यंत पोहोचत नाही तोच त्यांची तब्येत अचानक बिघडली. पुन्हा त्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. परंतु उशीर झाल्याने शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टरांना त्यांना वाचविण्यात यश आले नाही. "कदाचित त्यांनी सुरुवातीलाच ईसीजी काढला असता, तर ही घटना घडली नसती" अशा प्रकारची चर्चा कर्मचारी वर्गात ऐकायला मिळाली.

ते मूळचे सिन्नर तालुक्यातील होते

जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असलेले व नेहमी कामाला प्राधान्य देणारे जगताप यांचे अचानक निधन झाल्याची वार्ता पसरताच परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसून आली. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे सिन्नर तालुक्यातील होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT