corona covid.jpg 
नाशिक

BREAKING : मालेगावात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू. मृतांचा आकडा १० वर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात बुधवारी (ता.२२) आणखी दोन कोरोनाबाधितांचा जीवन हॉस्पीटलला उपचार सुरू असतांना मृत्यु झाला.  यामध्ये नयापूरा भागातील ४५ वर्षीय पुरूष व हाजी अहमदपूरा येथील ४९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरात ९६ कोरोनाधित रूग्ण असून मृतांची संख्या आता १० झाली आहे. आज मुत्यु झालेल्या  पुरूषाला मधुमेहचा त्रासही जाणवत होता. तीन दिवसापूर्वी त्यांनी येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात एक साठ वर्षीय महिला व एका आठ वर्षीय शाळकरी मुलीचा समावेश आहे. 

वाढती रूग्णसंख्या व मृत्युमुळे हादरला जिल्हा
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज घटना व्यवस्थापक म्हणून अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांची नियुक्ती केली. पाठोपाठ घरेघरी सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागासह चाळीस अधिकारींची व पथकाची नियुक्ती केली आहे. वाढती रूग्णसंख्या व मृत्यु यामुळे जिल्हा हादरला आहे. रूग्णसंख्या आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नसल्याने रमजानसारख्या सणावर कोरोनाचे काळे सावट आहे. शहरवासीयांनी यातून बोध घेवून शासनाच्या सुचनांचे पालन करावे, घरी रहावे. अन्यथा नवीन विभागात हा संसर्ग वाढण्याची भिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT