नाशिक : जून व जुलैमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मृत्यूदरही वाढल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणताना प्रशासनासमोर मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले. मृत्युदराची कारणमीमांसा करताना सर्वाधिक मृत्यू साठ वर्षांपेक्षा अधिक म्हणजे वयोवृद्धांचे झाले असून, त्यासोबतच तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक चिंताजनक आहे.
मृतांत ११ टक्के तरुण
एकूण २४५ मृतांपैकी ११४ मृत रुग्णांना विविध प्रकारचे आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यात डायबेटिसने २५ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अतितणावामुळे १७, हृदयरोग १०, किडनी दोन, श्वसनाच्या आजाराने सात, तर इतर आजाराने सात जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. यात सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे तरुणांचे मृत्यूचे प्रमाण ११ टक्के आहे. आजार नसलेले तरुण मृत्यू पावणे ही धोक्याची घंटा आहे.
मृत्यूमागची महत्त्वाची कारणे
नाशिक शहरात ६ एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. नंतर रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली. एप्रिल व मे महिन्यात अवघे ५२ कोरोनाबाधित होते. मात्र, जून व जुलैमध्ये शंभर पटींनी दररोज वाढ होत गेली. ही वाढ नाशिक शहराला रेड झोनमध्ये टाकण्यास कारणीभूत ठरली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे मृत्युदरातही वाढ झाली आहे. २५ जुलैपर्यंत शहरात २४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांत ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. १२३ वयोवृद्ध कोरोनामुळे मृत्यूच्या दारात ओढले गेले. त्यापाठोपाठ ५० ते ६० वयोगटातील ६४ नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. वास्तविक ५० ते ६० वयोगटात रोगप्रतिकारशक्ती चांगली असते; परंतु वेळेवर रुग्णालयात दाखल न करणे, काळजी न घेणे व डायबेटिस, रक्तदाब, किडनीचे आजार असे विविध आजार जडणे ही मृत्यूमागची महत्त्वाची कारणे आहेत.
अशी आहे मृतांची आकडेवारी
१५ वर्षांखालील ०
१५ ते ३० वर्षे वयोगट ४
३० ते ४० वर्षे वयोगट १८
४० ते ५० वर्षे वयोगट ३६
५० ते ६० वर्षे वयोगट ६४
६० वर्षापेक्षा अधिक वयोगट १२३
मृत पुरुष १७९
मृत महिला ६६
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.