Ongoing late kharif onion cultivation in Shiwar here. esakal
नाशिक

Nashik Onion News : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; सुमारे सव्वा ते दीड लाख क्षेत्रावरच लागवडीचा अंदाज

मोठाभाऊ पगार

Nashik Onion News : कांदा हे प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कसमादेसह चांदवड, येवला, नांदगाव भागात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याची लागवड गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात उच्चांकी दोन लाख २० हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ (रब्बी) कांद्याची लागवड झाली होती. परंतु यंदा मात्र सव्वा ते दीड लाखाच्या आसपास क्षेत्रावरच उन्हाळ कांद्याची लागवड होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की.

कांदा उत्पादक क्षेत्रात पावसाळी म्हणजे पोळ कांदा, लेट खरीप कांदा व उन्हाळी (रब्बी) कांदा असे तिन्ही प्रकारचे कांदा पीक येथे घेतले जाते. पण कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांद्यालाच जास्त पसंती देतात. (Decline in summer onion cultivation area nashik news)

यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची तर होरपळ झालीच शिवाय पावसाच्या वक्रदृष्टीमुळे नद्या-नाले, धरणे-तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम घेणे अशक्य आहे. अशी सर्व परिस्थिती असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट होणार आहे.

सध्या उन्हाळ कांद्यासाठी रोपवाटिका अर्थात उळे टाकले जात आहे. गिरणा, मोसम, आरम या नदी काठावरील शेतकरी तसेच पाट कॅनॉलचे लाभधारक व असेच काही थोडेफार शेतकरी उळे टाकत आहेत. तर इतर शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदा घेणे पसंत केले आहे.

भावात घसरणच

मधल्या ८-१० वर्षाच्या काळात डाळिंब हे येथील प्रमुख पीक होते. परंतु तेल्या रोगांच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब बागा उपटून पुन्हा कांद्यावर लक्ष केंद्रित केले. मागील वर्षी कांद्याचे बंपर उत्पादन झाले. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला.

परंतु कांद्याचे भाव वाढणार अशी स्थिती असतानाच कांद्याचे निर्यातशुल्क ४० टक्के केल्याने इथूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वासे फिरले. पुढे जाऊन व्यापाऱ्यांनी त्याविरोधात लिलाव बंद ठेवले. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा चाळीतच खराब झाला.

सुरवातीला भाव नव्हता, मधल्या टप्प्यात कांदा खराब झाला. नंतर निर्यातशुल्क वाढले मग व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आणि आता आवक वाढली यामुळे कांद्याचे भाव शेवटपर्यंत वाढलेच नाहीत.

२०२२ -२३ या वर्षातील उन्हाळ कांदा लागवड (हेक्टरमध्ये)

कळवण २६१०९

सटाणा ५१७३३

मालेगाव ३४६००

देवळा २१३६४

चांदवड १९२५५

येवला २५२७८

सिन्नर ११८५८

नांदगाव १११२३

निफाड १४७५१

नाशिक ११८४

इगतपुरी ३४०

पेठ १७७

त्र्यंबकेश्वर १२०

दिंडोरी २५१८

सुरगाणा ४११

एकूण - २२०८६४ हेक्टर

२०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील अंतिम खरीप कांदा लागवड : १६ हजार ३०० हेक्टर

लेट खरीप लागवड - १० हजार ६३५ हेक्टर

"कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात ४० ते ४५ टक्के घट येण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. पाऊस नसल्याचा हा परिणाम आहे. कसमादेसह कांदा उत्पादन करणाऱ्या इतरही तालुक्यात पाण्याचे टंचाई असल्याने उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की." - कुबेर जाधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT