Decoration of Palkhi Rath of Sant Nivruttinath Maharaj with different varieties of flowers every day nashik news
Decoration of Palkhi Rath of Sant Nivruttinath Maharaj with different varieties of flowers every day nashik news esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : फुलांच्या सजावटीतून विठ्ठलचरणी भक्ती; 30 वेळा होते रथाची सजावट!

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Palkhi : आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी रथाची रोज ताज्या सुवासिक आणि वेगवेगळ्या जातीच्या फुलांची सजावट होत आहे.

माडसांगवीच्या मित्रमंडळींचा त्यात सहभाग आहे. (Decoration of Palkhi Rath of Sant Nivruttinath Maharaj with different varieties of flowers every day nashik news)

माडसांगवी येथील दिवंगत शिवाजी महाराज पेखळे यांच्या प्रेरणेने ही रथसजावट परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. वेगवेगळ्या गावांतील मित्रमंडळी, सामाजिक संस्था, वारकरी आणि तरुण मंडळी यांच्या माध्यमातून रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी भल्या पहाटेच रोज रथ सजावटीसाठी लगबग सुरू होते. अतिउत्साहाने वेगवेगळ्या डिझाइन, हार, फुले, तोरणे आणि बुके यांच्या माध्यमातून रथाची सजावट केली जाते.

सुवासिक आणि आकर्षक फुलांनी रथासह नाथ महाराजांच्या पालखीचीही सजावट पहाटे पाच ते सकाळी सात या वेळेत पूर्ण करून रथ सजावटकार मंडळींच्या माध्यमातून पालखी रथात ठेवली जाते. सजावटकारांचा मानाचा नारळ देऊन सन्मान केला जातो.

रथसजावटीसाठी एक ते दोन दिवस अगोदर उत्तम प्रकारच्या फुलांची खरेदी करून रथाच्या मापाच्या तोरणांची बांधणी करावी लागते. वेगवेगळ्या प्रकारांत फुलांचे हार तयार केले जातात. सजावटीचा साधारण पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकारे फुले गुंफली जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोजचा सर्व खर्च रथ सजावटकार मंडळी करतात. शिवाजी पेखळे यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले असले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा त्यांनी जबाबदारी सोपवलेली मित्रमंडळी, सामाजिक संस्था, ग्रामस्थ, तरुण मंडळी आजही मोठ्या उत्साहात पार पाडत आहे.

रथाच्या प्रस्थानापूर्वीच रथसजावटीचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारीच्या रिंगण सोहळ्यापर्यंत मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत साधारण २९ ते ३० ठिकाणी रथाची सजावट केली जाते. या वर्षी परतीच्या मार्गावरही रथाच्या सजावटीचे नियोजन काही मंडळींकडून करण्यात आले आहे.

रथाच्या सजावटीचे हे १८ वे वर्ष असून त्यासाठी संजय तांबे, ज्ञानेश्वर गायखे, दशरथ पेखळे, शिवाजी गायखे, ज्ञानेश्वर दाते आदी नियोजन करतात. सजावटीसाठी सुभाष काठे, राजू महाले, अरुण बिडवे, सुरेश आहेर, रमेश वाघ, वासू सोनवणे, पांडुरंग बनकर, गोकुळ पेखळे, कैलास माळी, पप्पू घुमरे, सतीश मंडलिक, प्रदीप चव्हाण, चंदन वाघ, किशोर फड, तन्मय गावंड यांच्यासह अनेक गावागावांतील सामाजिक मंडळी अगदी तनमनधनाने सहभागी होऊन रथसजावट आणि पंढरीच्या वारीचा आनंद घेतात.

"आषाढी वारीसाठी रथाची सजावट म्हणजे आमच्यासाठी आनंदवारी असून, आम्ही मित्रमंडळी अगोदरच दैनंदिन कामाचे नियोजन करून रथासाठी आवश्यक असणारे फुले आणि इतर साहित्य घेऊन आदल्या रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो.

पहाटे पाचला रथाची सजावट सुरू होते. सातपर्यंत सजावट पूर्ण करून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची फुलांनी सजवलेली पालखी रथात ठेवून पुढील प्रवासासाठी रथ मार्गस्थ होतो." - सुभाष काठे, रथ सजावटकार, मित्रमंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT