पंतप्रधान पीकविमा योजना
पंतप्रधान पीकविमा योजना Sakal
नाशिक

पंतप्रधान पीकविमा योजनेत एक लाख ३१ हजार शेतकऱ्यांमध्ये घट

महेंद्र महाजन

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात दोन लाख ७२ हजार ३६४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यंदा एक लाख ३१ हजार ७९६ कमी म्हणजेच, एक लाख ४० हजार ५७१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३६५ प्रस्ताव युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीला सादर केले होते. त्यातील २५५ प्रस्ताव मंजूर झाले. नामंजूर ५१ प्रस्तावांपैकी अनावश्‍यक कारणास्तव नामंजूर केलेल्या १६ प्रस्तावांची फेरपडताळणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विमा कंपनीला दिली.

जिल्हास्तरावर २०१९-२० मध्ये उशिराने प्राप्त प्रस्तावांना विमा कंपनीस स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री. मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी निगडित योजनांच्या जिल्हास्तरीय अभियान समितीची आढावा बैठक सोमवारी (ता. ३०) झाली. राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण, मृद आरोग्यपत्रिका, क्रॉससॅप योजनेंतर्गत कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी, गटशेती, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पाणलोट एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, विकेल ते पिकेल अभियान, संत सावता माळी रयत बाजार अभियान, आत्मनिर्भर भारत पॅकेज, पंतप्रधान पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना आदींबाबत कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी माहितीचे सादरीकरण केले. राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत चार उपविभागातील दोन गावे याप्रमाणे आठ गावांना फेरतपासणी करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली. अतिरिक्त निवडायच्या नऊ गावांसाठी कृषी आयुक्तालयस्तरावरून मंजुरी घेऊन कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली.

नागलीची माहिती व्हावी उपलब्ध

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या २०२१-२२ वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत प्रक्रियेसाठी नागली पिकाची उपलब्धता किती प्रमाणात आहे, याची आकडेवारी घेण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केली. २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये निवडलेल्या १६ शेतकरी गटांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रतिसाद न देणारे गट रद्द करण्याची उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रूट, अंजीर पिकांचा नव्याने समावेश केला असून, त्याची लागवड करण्याची सूचना दिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT