Petrol Price Hike affects on Humanity
Petrol Price Hike affects on Humanity esakal
नाशिक

‘लिफ्ट प्लिज’ला वाहनचालकांचा ‘ठेंगा’; इंधन दरवाढीचे ‘साईड इफेक्ट’

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : कोरोनाकाळातील ‘सोशल डिस्टन्सिंग’ (Social Distancing) आता जनमाणसातून निवळले असून, सर्वच व्यवहार ‘खुले’ झाले आहेत. खुल्या वातावरणात पूर्वाश्रमीचे जनजीवन रुजूवात होईल अशी अटकळ असताना इंधन दरवाढीचा फटका रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या वाटसरूंना बसतो आहे. वाहनचालकांचे सहजपणे ‘लिफ्ट देण्याचे दर्शन’ आता दुरापास्त बनले आहे. इंधन दरवाढीमुळे ‘लिफ्ट प्लिज’ला वाहनचालक कानाडोळा करत ‘ठेंगा’ दाखवत आहेत. (Decreasing humanity side effect of fuel price hike Nashik News)

कोरोनाच्या (Corona) भयभीत काळात जनजीवन प्रभावित झाले. मात्र, माणुसकीच्या दर्शनाला खंड पडला नाही. अडचणीच्या काळात मदतीसाठी सरसावणारे हात आणि माणुसकीशून्य वर्तनाचे दोन विरुद्ध टोके अनुभवली. कोरोना ओसरल्यावर जनमाणसांत पडलेले अंतर आता कुठे सावरू लागले असताना इंधनाच्या वाढत्या दराने पुन्हा माणुसकीशून्य वर्तनाचा परिचय वाटसरूंना येत आहे. उपलब्ध साधनांमुळे शहरी भागात लिफ्ट मागणाऱ्यांची संख्या तशी विरळ असते. ग्रामीण भागात दुचाकी व अन्य वाहनधारकांकडे लिफ्ट मागणे हा सहजभाव मनाला जातो. आजकाल लिफ्ट मागणीला कानाडोळा केला जात आहे. वाढती महागाई, रस्त्यांची दुरावस्था, इंधन दरवाढ, कोरोनाचे भय, दुचाकी दुरुस्तीचा महागडा खर्च यामुळे लिफ्ट बद्दल नकारात्मक भावना वाढीस लागते आहे.

इंधन दरवाढीवर ‘चौबल शीट’चा उपाय

एकीकडे लिफ्ट मिळत नसल्याने ग्रामीण शहरी भागात ये- जा करणाऱ्या मजूर वर्गाने एका दुचाकीवर चार- चार जणांनी प्रवास करण्याचा जालीम उपाय शोधून काढला आहे. शहरात वाहतूक पोलिसांचा डोळा चुकवत कामाचे ठिकाण ते घर असा प्रवास होत आहे. वाहतूक पोलिस चौकी भागात उर्वरित दोघांनी काही अंतर पायपीट करायची आणि पुन्हा चौबल शीटची सवारी बिनदिक्कत सुरू होते. वाढत्या इंधनावर शोधलेली मात्रा जीवघेणी आहे हे या वाहनचालकांना कळते. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी हा संघर्ष करावा लागतोय, अशी हतबलता कामगारवर्ग कथन करत आहे. महागाईच्या झळांची तीव्रता कामगार वर्ग किती भयावह स्थितीला जाऊन सोसतोय याचे हे करुणामय चित्र होय. सकाळी ‘चौबल शीट’ने ग्रामीण भागातून शहराकडे अन्‌ सायंकाळी घराकडे दौडणाऱ्या दुचाचाकींचे वाढते दर्शन इंधन दरवाढीच्या भयावह पाऊलखुणा कथन करणाऱ्या ठरताहेत.

कोरोनाकाळाची शिकवण

कोरोनाकाळात दुचाकीस्वारांनी माणुसकीच्या भावनेतून वाटसरूंना ‘लिफ्ट’ दिली. परंतु, या प्रकाराने अनेकांना कोरोनाची लागण झाली. हाच धसका आता इंधन दरवाढीला जोडून लिफ्टला कानाडोळा करण्यासाठी जोडला जातोय. हे बदलते जनमानस वाटसुरूंसाठी माणुसकीचा झरा आटू लागल्याचे लक्षणचिन्ह ठरत आहे. वाटसरूंना एकत्र पायपीट अथवा भाडोत्री वाहनांची प्रतीक्षा करावी लागते आहे.

"इंधनाचे वाढते दर आणि गाड्यांच्या ॲव्हरेजची चिंता यामुळे वाहनचालक आता लिफ्ट देईनासे झाले आहेत. इंधन दरवाढीपुढे माणुसकी कमकुवत ठरते आहे."

- ॲड. सुधाकर निकम, माजी सरपंच, दाभाडी

"जादा प्रवाशांना बसवून दुचाकी चालवणे ही हौस नसून महागाईचे भयावह चित्र आहे. रोजंदारीसाठी हातमजूर शहराचा आसरा घेतो. पोटाची खळगी भरण्यासाठीचा कामगार वर्ग जीवघेणा संघर्ष करीत आहे."

- योगेश बागूल, सामाजिक कार्यकर्ता, दाभाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT