kalvit 123.jpg 
नाशिक

अगोदर काळवीट..आता हरिण..समाजकंटकांकडून अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा

संतोष विंचू

नाशिक / येवला : परिसरातील अनेक शेतकरी हरणांचे लाड पुरवतात. किंबहुना शेतकरीच या हरणांच्या सुरक्षेची काळजी घेतात. असे असताना काही समाजकंटक या हरणांच्या जिवावर उठत असल्याच्या अनेकदा घटनांचा खुलासा झाला आहे. 

अनेक घटनांचा खुलासा

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागात सुमारे दहा हजार हेक्टर जमीन असून, यात पाच हजारांच्या आसपास हरणांचा वावर आहे. हरणांकडून शेतीचे नुकसान होत असूनही परिसरातील अनेक शेतकरी हरणांचे लाड पुरवतात. किंबहुना शेतकरीच या हरणांच्या सुरक्षेची काळजी घेतात. असे असताना काही समाजकंटक या हरणांच्या जिवावर उठत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यापूर्वी रेंडाळे येथील ग्रामस्थांनी २००९ मध्ये मालेगाव येथील एका टोळीला बंदुकीसह शिकार करताना रंगेहाथ पकडून दिले होते.

डोक्यात दगड टाकून निर्घृणपणे शिकार

डोंगरगाव (ता. येवला) येथे हरणाची शिकार करणाऱ्या संशयितास वन विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ११) दुपारी राजापूर-ममदापूर वनहद्दीत मृत हरणासह पकडले. त्याचे चार ते पाच साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अधूनमधून रात्रीच्या वेळी येथे शिकार होत असल्याच्या चर्चेलाही ग्रामस्थ दुजोरा देतात. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वन विभागाने शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. डोंगरगाव येथे एका खासगी शेतीमध्ये काही जण हरणांची शिकार करणार असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला असता, एका शेतात जाळीच्या सहाय्याने हरणाला पकडून त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून निर्घृणपणे शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मृत काळविटासह अटक

या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने मधुकर शिवाजी पवार (रा. बिलवणी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) याला मृत काळविटासह अटक केली आहे. त्याचे पाच साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. भंडारी यांच्यासह वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, वनसेवक विलास देशमुख आदींनी ही कारवाई केली. त्यांना उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT