Covishield News esakal
नाशिक

Nashik NMC News : 10 हजार कोव्हीशिल्डची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून पुन्हा जोमाने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असली तरी कोव्हीशिल्ड लस उपलब्ध नसल्याने दहा हजार कोव्हीशिल्डची मागणी नोंदविण्यात आली आहे. (Demand for 10 thousand Covishield Nashik NMC News)

परंतु, अद्यापपर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. सतर्कतेचा भाग म्हणून अत्यावश्यक सुविधांची जमवाजमव केली जात आहे. कोरोना भीतीने नागरिकांची पावले लसीचा बूस्टर डोस घेण्याकडे वळली आहे.

नागरिकांकडून कोव्हीशिल्ड लसीची मागणी केली जात आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे १८ हजार डोस शिल्लक आहेत. परंतु बहुतांश नागरीकांनी कोव्हीशिल्ड लस टोचली असल्याने त्यानुसार मागणी वाढली आहे. शहरात सरासरी ९६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

त्यात १८ ते ४४ वयोगटातील दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७६ टक्के आहे. चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८१ टक्के आहे. पंधरा ते अठरा वयोगटातील ५१ टक्के, तर बारा ते चौदा वयोगटात दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT