Watermelon fruit
Watermelon fruit esakal
नाशिक

विकेल ते पिकेल अभियान यशस्वी; मालेगावची कलिंगडे काश्मिरला रवाना

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : काश्‍मिरच्या सफरचंदाची चव उभा देश चाखतो. तालुक्यातील लेंडाणे येथील शेतकरी अनिल जगताप यांच्या रसिका वाणाचे कलिंगड-टरबूज रमजान काळात काश्‍मिरला विक्रीसाठी रवाना झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा या हेतूने कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातूनच कलिंगड विक्रीसाठीची पहिली गाडी काश्मिरला पाठविण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी कळविले आहे. यामुळे हे अभियान यशस्वी होत असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अनिल जगताप यांनी रसिका वाणाचे कलिंगड ०.३० हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेतले. दर्जेदार कलिंगड आल्याने या फळ पिकाचे उत्पादन घेतलेल्या पहिल्या गाडीचा शुभारंभ उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.

तालुक्यात ५२ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात भाजीपाला विक्री व्यवस्थापनात मे. गिरणाई ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अंजदे बुद्रुक ही अग्रेसर आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीचे संचालक किरण शिंदे, भरत कांडेकर, दिनेश सोळुंके, सचिन ढमाळे, अमोल माळी, अतुल पाटील हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन द्राक्ष, कलिंगड इत्यादी खरेदी करुन कोणताही नफा न घेता शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल काश्मिर, अनंतनाग, रोहतक, अंबाला, सिलीगुडी, पश्चिम बंगाल तर द्राक्ष नेपाळ, येथे विक्रीसाठी पाठवित आहे.

तालुका फळे व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. डाळिंब, शेवगा, कांदे आणि कलिंगड अशी महत्वाची भाजीपाला व फळ पीके घेतली जातात. चालुवर्षी तालुक्यात १ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर विविध वाणाचे कलिंगड लागवड करण्यात आली आहे. शेतकरी बांधवानी नवीन संकरीत वाण, ठिंबक सिंचन, प्लास्टिक मल्चिंगच्या सहाय्याने सुधारीत कृषी तंत्रज्ञानावर आधारीत कलिंगडचे एकरी २००-२५० क्विंटल उत्पादन घेतले. चालु हंगामात कांदा हे पीक इतर राज्यात निर्यात करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, सुधाकर पवार, श्री. व्यवहारे, भास्कार जाधव, मोहिनीराज मोरे, अनिल बच्छाव, संदीप राजनोर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT