mutton curry esakal
नाशिक

गोडधोडानंतर खवय्यांचा मटणावर ताव; मांसाहाराला मागणी वाढली

अरूण मलाणी

नाशिक : मकर सक्रांतीनिमित्त (Makar sankranti) आहारात भरपूर गोडधोड पदार्थ खाल्‍यानंतर आता खवय्ये तिखटाकडे वळू लागले आहेत. त्‍यातच गारठा (Cold) वाढला असताना, मांसाहाराला (meat) मागणी वाढली आहे. आवक मुबलक प्रमाणात असल्‍याने दर मात्र स्‍थिर असल्‍याचे व्‍यावसायिकांनी सांगितले.

हिवाळ्यात (Winter) उष्ण गुणात्‍मक आहाराची शरीराला आवश्‍यकता असते, म्‍हणून अन्‍य विविध पदार्थांप्रमाणे ज्‍यांना शक्‍य आहे, त्‍यांनी मांसाहार करण्याचा सल्‍ला आहार तज्‍ज्ञांकडून दिला जातो. गेल्‍या काही दिवसांपासून मकर सक्रांतीनिमित्त तीळगूळ, चिक्‍की, अशा गोड वस्‍तूंचे सेवन सुरू होते. अशात काहीसा बदल करत तिखट पदार्थांचा आहारात समावेश केला जात आहे. यातून रविवारी (ता. १६) मांसविक्री दुकानांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळाली. मटण, चिकनसोबत मासळी पदार्थांनाही मागणी वाढली होती.

‘पाया’ला मागणी

अस्‍थिविकार असलेल्‍या, वृद्धांना हिवाळ्यात पाया सूप पिण्याचा सल्‍ला दिला जातो. अशात पायांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शंभर रुपये जोडीपासून पाया विक्री सुरू होती.

असे आहेत दर

स्‍थानिक बाजारपेठेत ६५० ते ६७० रुपये प्रतिकिलो दराने मटणची विक्री सुरू होती. तर ब्रॉयलर चिकन दोनशे रुपये प्रतिकिलोपासून पुढे विक्री केले जात होते. गावठी चिकन चारशे रुपये प्रतिकिलोपासून पुढे उपलब्‍ध होते. माशांचे दर सातशे ते एक हजार रुपये किलो होते. मांसाहाराप्रमाणे अंडींच्‍या मागणीत वाढ झाली आहे.

''गेल्‍या काही दिवसांपासून ग्राहकांकडून मांसाहाराला मागणी वाढली आहे. मुबलक उपलब्‍धतेमुळे दरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. पुढील आणखी काही दिवस अशीच मागणी कायम राहण्याची शक्‍यता आहे.'' - अनिल जाधव, विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuvraj Singh : तू आणखी ३ ते ६ महिने जगू शकतोस... युवराज सिंगला डॉक्टरांनी सांगितले; माजी खेळाडू म्हणाला, मेलो तरी चालेल, पण...

Post Office Scheme: 300 रुपयांची बचत 15 लाखांचा फंड! व्याजतूनच मिळतील तब्बल 4.40 लाख; पोस्ट ऑफिस योजनेचा जबरदस्त फायदा

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर महिलेचा खून; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय

Sharad Pawar: बारामतीत विडी कामगाराला उभं केलं, पण आमदार झाले विजयराव मोरे! पवारांचा राजकीय डाव फसवणारे मोरे घराणे

Taj Mahal Treasure Discovery : समुद्रात गाडला गेलेला ताजमहलचा खजिना! ३०० वर्षानंतर सापडलाय; उलगडलं मुघलकालीन रहस्य, पाहा

SCROLL FOR NEXT