Demand for permission to appoint 2 Deputy sarpanch nashik news esakal
नाशिक

Nashik News : 2 उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे आम्हाला देखील हवे.... दिंडोरी गावाची अजब मागणी!

दिगंबर पाटोळे

Nashik News : राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यात आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत.(Demand for permission to appoint 2 Deputy sarpanch nashik news)

या सर्व पार्श्वभूमीवर  गावाच्या विकासासाठी देखील गावाला दोन उपसरपंच असावेत अशी मागणी आता ग्रामिण भागातूनही होवू लागली आहे.

महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून, तशाच प्रकारची दोन उपसरपंच पदाची नेमणूक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ग्रामपंचायत) करायची असल्याने, याबाबत सकारात्मक मार्गदर्शन मिळण्याचे पत्र जऊळके दिंडोरी, ता. दिंडोरी येथील ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागूल यांनी निवेदनाद्वारे दिंडोरीचे तहसिलदारांकडे केली आहे.

गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य झालेले असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच पद मिळावे, अशी अपेक्षा असते. त्यातच सरपंचपद राखीव असते त्यामूळे इतरांना संधी मिळत नाही.

दोन उपसरपंच करण्याची तरतूद केली तर सर्वांनाच पाच वर्षाच्या कालावधीत उपसरपंच पदाची संधी मिळेल यासाठीच जऊळके दिंडोरी, ता. दिंडोरी येथील ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागूल यांनी दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांची भेट घेवून गावात दोन उपसरपंच नेमणूक करायची असल्याने मार्गदर्शन मिळण्याबाबतचे पत्र दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT