Demand grown significantly for khadi due to scorching heat 5% increase in rates esakal
नाशिक

उन्हाच्या चटक्याने ‘खादी’ला मागणी वाढली; दरांमध्ये ५ टक्के वाढ

- युनूस शेख

जुने नाशिक : उन्हाच्या चटक्याने खादी (Khadi) कपड्यांना मागणी वाढली आहे. महागाईची झळ खादीसही बसली आहे. दरांमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. पांढरा शर्ट आणि कापडास सर्वाधिक मागणी असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. दैनंदिन शहरातील तापमान वाढत आहे. आत्तापर्यंत चाळिशीपर्यंत तापमान गेले आहे.

उन्हामुळे शहरवासीयांची लाही- लाही होत आहे. दैनंदिन कपड्यांमुळे घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचा खादी कपडे परिधान करण्याकडे कल वाढला आहे. शर्ट, पॅन्ट महिलांसाठी साडी, ड्रेस मटेरिअल तसेच बेडशीट, चादर, हात रुमाल, पायजमा अशा विविध प्रकारचे कपड्यांची मागणी नागरिक करत आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० टक्के मागणी वाढली आहे. उन्हात पांढरे कपडे परिधान केल्याने उन्हाच्या झळा कमी बसतात. त्यामुळे सफेद शर्ट, कपडा, ड्रेस मटेरिअल यांची सुमारे ५० टक्के अधिक मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पांढरे कपडे विक्रीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनांची मागणीदेखील होत आहे.

सौंदर्यप्रसादनांच्या मागणीतही वाढ

उन्हापासून बचाव करणारे आयुर्वेदिक रसायन मुक्त खादी ग्रामउद्योगातील सौंदर्यप्रसादनास देखील चांगली मागणी आहे. साबण, बॉडी वॉश, फेस वॉश, सन स्क्रीन लोशन अशा विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसादनासह चंदन तेल,गुलकंद, चंदन पावडर देखील विक्री होत आहे.

असे आहे दर

कपड्याचे प्रकार (दर रुपयांत)

शर्ट ५०० ते १ हजार

पॅन्ट १ हजार ते १ हजार २००

पायजमा ४५००

ड्रेस मटेरिअल १ हजार ते १ हजार २००

साडी १ हजार १०० ते १ हजार ८००

बनियन २५० ते ३५०

हात रुमाल २० ते ७६

मोदी जॅकेट ७०० ते १ हजार २००

चादर ३५० ते ४००

बेडशीट ३७० ते १ हजार

शाल ४००

"उन्हाळ्यात खादीचे कपडे परिधान करण्याकडे नागरिकांचे मोठे आकर्षण असते. यंदादेखील उन्हाच्या चटक्यामुळे खादीच्या कपड्यांना चांगली मागणी आहे. सफेद कपडे शर्ट यास अधिक मागणी आहे. सफेद कापडामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के वाढ झाली आहे."

- सचिन पवार, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भांडार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT