doctor-patient.png 
नाशिक

वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसचा डंख!...सामान्य जनतेला फटका...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) शहरात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्यामुळे कट प्रॅक्‍टिस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कट प्रॅक्‍टिसचा तोटा रुग्णांना सहन करावा लागत असून, डॉक्‍टरांच्या कट प्रॅक्‍टिसला लगाम लावण्यासाठी नांदेड पॅटर्न राबविला पाहिजे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

तपासण्यांचे नावाखाली गरीब रुग्णांना ओरबाडून खाण्याचा प्रकार

नाशिकमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. शहरातील स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट डॉक्‍टर सध्या कट प्रॅक्‍टिसच्या विळख्यात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. वैयक्तिक जनसंपर्क अधिकारी ठेवून स्पेशालिटीचे ब्रॅंडिंग करीत आहेत. हे ब्रॅंडिंग करतानाच डॉक्‍टर किती कट देतात, याचीही माहिती पीआरओ इतर डॉक्‍टरांना देतात म्हणून नवीन आलेले डॉक्‍टर सध्या कट प्रॅक्‍टिसवरच वैद्यकीय व्यवसाय करू पाहत आहेत. रुग्ण डॉक्‍टरांकडे गेल्यावर निरनिराळ्या तपासण्यांचे नावाखाली गरीब रुग्णांना ओरबाडून खाण्याचा प्रकार वाढला आहे. याची अनेक उदा हरणे दिसून येतात. 

काय आहे नांदेड पॅटर्न?

मराठवाड्यातील औरंगाबादनंतर नांदेडचे नाव कट प्रॅक्‍टिसमध्ये बदनाम झाले होते. मात्र, तेथील आयएमए या डॉक्‍टरांच्या संस्थेने कट प्रॅक्‍टिस करणाऱ्या आपल्याच बांधवांविरोधात दंड थोपटले आहेत. कट प्रॅक्‍टिस करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांची नोंदणी बंद करण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार येथील आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हाच पॅटर्न आता नाशिकमध्ये राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठी कॉर्पोरेट रुग्णालये सध्या जादा मोबदल्याच्या आमिषाने डॉक्‍टरांना आकर्षित करत आहेत. यात सामान्य जनता भरडली जात आहे. नाशिक मधील अनेक डॉक्‍टर रेफरल प्रॅक्‍टिसवर जगत आहेत. यात ग्रामीण भागातील डॉक्‍टरांची संख्या लक्षणीयरित्या दिसत आहे. 

पूर्वीपासूनच आयएमएने कट प्रॅक्‍टिसला विरोध केला आहे. आजपर्यंत कोणावरच कारवाई झाली नाही. जनतेतून तक्रारी आलेल्या नाहीत. कट प्रॅक्‍टिस कोणी करत असेल तर पुराव्यासह तक्रार करावी. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. - डॉ प्रशांत देवरे, अध्यक्ष- आयएमए 

रुग्णांनी सजग राहणे आवश्‍यक आहे म्हणून समाजात डॉक्‍टरांविषयी विश्‍वासार्हता वाढली पाहिजे. यासाठी आयएमएने पुढाकार घ्यायला हवा. - डॉ. राजेंद्र जाधव, सर्जन 

आमच्या संघटनेत कट प्रॅक्‍टिस कोणी करत नाही. यावर चर्चाही केली जात नाही. सर्व डॉक्‍टर स्वयंविकासावर व्यवसाय करतात. - डॉ. प्रशांत मुठाळ, अध्यक्ष- आयएमए, नाशिक रोड  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT