नाशिक : महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असताना, आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याने महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. हे कमी म्हणून की काय नाशिक तहसीलदारांनी प्रशासन उपायुक्तांना नोटीस काढली आहे.
जिल्हा प्रशासनाला कर्मचाऱ्यांची कमतरता
१५ जानेवारीला जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाला कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांची मागणी केली जात आहे. नाशिक महापालिकेकडे नाशिक तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांची माहिती मागविली. मात्र, महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं
तहसीलदारांची प्रशासन महापालिकेला नोटीस
सात हजारांपैकी चार हजार ८१० कर्मचारी असून, दोन हजार २०० जागा रिक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात काम करता येणे शक्य नाही. त्यात महापालिकेसाठी जानेवारी ते मार्च हे तीन महिने महत्त्वाचे असतात. याच महिन्यात मोठ्या प्रमाणात वसुली होते. कोरोनामुळे आरोग्य व वैद्यकीय विभागातील मनुष्यबळ देता येणार नाही. त्यामुळे महापालिकेची नकारात्मक भूमिका लक्षात घेऊन माहिती न दिल्याने तहसीलदारांनी महापालिकेला नोटीस काढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.