dengue esakal
नाशिक

नाशिकमध्ये डेंगी रुग्णसंख्येवर नियंत्रण; 5 वर्षांत अंमलबजावणी

प्रशांत कोतकर

नाशिक : संशयित डेंगी ताप (dengue) रुग्णाचे आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत (health workers) नियमित रक्त, जल नमुने घेऊन तपासणी करून बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे नाशिक विभागातील डेंगी रुग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागास नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे. लवकरच विभागातील डेंगी आजार नियंत्रणात येईल, असा विश्वास हिवताप विभागाच्या सहाय्यक संचालकांकडून व्यक्त करण्यात आला. (Dengue-patient-control-in-Nashik-marathi-news)

कोरोनाच्या महामारीत नुकताच राष्ट्रीय डेंगी दिवस आला आणि गेला. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांत आजाराची स्थिती काय हे जाणून घेतले. कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक येथे सहाय्यक संचालक (हिवताप) हे विभागीय कार्यालय आहे. प्रामुख्याने कीटकजन्य आजारात मलेरिया, डेंगी, चिकूनगुनिया व हत्तीरोग यांसारख्या आजाराचा समावेश होतो. नाशिक विभागातील ५४ तालुक्यांमध्ये हा डेंगीचा आजार होऊच नये, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रसिद्वी व जनजागरण मोहीम सातत्याने सुरू असते. या सर्व उपाययोजनांमुळे डेंगी रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. त्यातही २०२० मध्ये नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यांत वाढ दिसत आहे. नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांत सध्या डेंगीचे रुग्ण अत्यल्प आढळत आहेत, तेही प्रामख्याने चरितार्थासाठी जात असलेल्या नजीकच्या राज्यात गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील स्थलांतरित मजुरांमध्ये आढळतो. हा आजार प्रामुख्याने शहरात व ग्रामीण भागातील शहरीकरण झालेल्या भागात होण्याची शक्यता दाट असते. या डेंगी आजारासह इतर कीटकजन्य आजारांचे प्रमाण टाळण्यासाठी पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यात येतात. तसेच पिण्याच्या पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवले जातात व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात येतो. जोखीमग्रस्त भागात कीटकनाशक औषधांची फवारणी करून घेणे, घराच्या छतावरील भंगार सामान जसे फुटके डबे, निरुपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या यांची वेळीच योग्य विल्हेवाट लावणे, स्वच्छतागृहाच्या व्हेंट पाइपाला वरच्या बाजूला जाळी बांधणे याबाबत राष्ट्रीय कीटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागातर्फे सातत्याने जनजागृतीबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना गावपातळीवर मोहीम राबविण्यात येते.

वर्ष-----------बाधित रुग्ण-------मृत्यू

२०१६---------१९५७-----------८

२०१७---------१७४१-----------३

२०१८---------२४११-----------६‍

२०१९---------३८५४-----------२

२०२०-----------८२९-----------०

३० एप्रिलपर्यंत------७६-----------०

डेंगी या आजाराबाबत नाशिक विभागात गेल्या केवळ पाच वर्षांत प्रभावी जनजागृतीपर कार्यक्रम व नियमित पर्यवेक्षणाखाली उपचार केले जात असल्यामुळे डेंगी रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. -डॉ. पी. डी गांडाळ, उपसंचालक, आरोग्यसेवा, नाशिक मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army Attack : बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; सलग दुसऱ्या दिवशी पाच सैनिक ठार

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेध

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर माता लक्ष्मी अन् कुबेर देव दोघेही होतील नाराज

SCROLL FOR NEXT