dengue
dengue esakal
नाशिक

Nashik Dengue Update: नववर्षातही डेंगीच्या डंख कायम; 5 दिवसांतच 11 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवीन वर्षाचे जोरदार स्वागत डेंगीच्या डासांनी केले आहे. जानेवारीत पहिल्या पाच दिवसात अकरा नवीन रुग्णांची भर पडली. आरोग्य विभागाकडून जानेवारी ते डिसेंबर असे वर्ष ग्राह्य धरले जाते.

जानेवारीत अकरा डेंगीचे रुग्ण आढळून आल्याने डिसेंबरमधील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. (Dengue stings persist even in New Year 11 new patients in 5 days nashik)

२०२३ मध्ये डेंगीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात ४७ रुग्ण होते. सप्टेंबर महिन्यात २६१ तर ऑक्टोबर महिन्यात डेंगूचे १९३ रुग्ण आढळून आले होते. नोव्हेंबर महिन्यात २७५ रुग्ण आढळून आल्याने डेंगी चा स्फोट झाल्याचे दिसून आले.

डिसेंबर महिन्यात दोनशे सहा नवीन आढळले एकूण एक हजार १९१ रुग्ण मागील वर्षात आढळून आले. डेंगी मुळे वर्षभरात तिघांचा मृत्यू झाला.

नाशिकरोड विभागातील आनंदनगर परिसरातील एक व्यावसायिक, सिडकोतील डिजीपीनगर, कामटवाडे परिसरातील एक डॉक्टर तर म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृद्ध महिला डेंगीमुळे मृत झाले आहे.

सर्वसाधारणपणे जानेवारीत डेंगीचे रुग्ण आढळून येत नाही. मात्र नवीन वर्षात पहिल्या पाच दिवसांमध्येच अकरा नवीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला आहे.

डेंगी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी धूर फवारणी जंतूनाशक फवारणी करण्याच्या सूचना मलेरिया विभागाने दिल्या. दरम्यान जानेवारीत पहिल्या पाच दिवसांमध्ये डेंगी पॉझिटिव्ह आढळलेल्या बाधितांच्या चाचण्या डिसेंबरमध्ये करण्यात आल्या होत्या.

तपासणी अहवाल पाच जानेवारीला प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला असून वाढत्या थंडीमुळे डेंगीचा प्रभाव कमी होत असल्याचा देखील एक दावा करण्यात आला आहे.

नागरिकांनी आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मलेरिया विभाग प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT