Deola Dialysis pilot project is Boon to patients esakal
नाशिक

देवळा : डायलिसीसचा पायलट प्रोजेक्ट ठरतोय रुग्णांना वरदान

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस (Dialysis) केंद्राकडे महाराष्ट्र राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून पाहिले जात आहे. याला कारण असे की देवळा ग्रामीण रुग्णालयातील या डायलेसिस सेंटरमध्ये आतापर्यंत २८० इतक्या संख्येने किडनी रुग्णांवर डायलिसिस करण्यात आले असून, नवीन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी दिली.

देवळा शहर व तालुक्यातील जनतेसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून डायलेसिस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रथमच देवळा ग्रामीण रुग्णालयात ही सेवा कार्यान्वित आहे. या डायलेसिस सेंटरमध्ये दोन अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहेत. दिवसभरातून दोन ते चार रुग्णांवर डायलेसिस प्रक्रिया पूर्ण होते. वाढता प्रतिसाद पाहता अजून तिसरे मशीनही उपलब्ध झाले असून, तेही लवकरच कार्यान्वीत होणार आहे.

यापूर्वी ग्रामीण भागातील रुग्णांना डायलेसिससाठी नाशिक व अन्य ठिकाणी जावे लागत होते. आणि त्यात खासगी दवाखान्यात डायलेसिस करण्यासाठी एका खेपेस प्रवासासह पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असतो. परंतु, देवळ्यासारख्या ग्रामीण भागात प्रथमच डायलेसिस सेंटर सुरू करून मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याने कसमादे परिसरातील नागरिकांसाठी ते वरदान ठरत आहे. आठवड्यातून पाच दिवस डायलिसिस सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध असते. या सेंटरमध्ये डायलेसिस तंत्रज्ज्ञ म्हणून सचिन राठोड, तर नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून अनिरुद्ध ढोकरे काम पाहतात.

"येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस सेंटर चालू असल्याने ग्रामीण भागाची चांगली सोय झाली आहे. याशिवाय सर्पदंश- श्‍वानदंशावरही प्रभावी उपचार करत रुग्णांना वाचवले जात आहे."

- डॉ. गणेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, देवळा ग्रामीण रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT