sparrow.jpg 
नाशिक

‘चिमण्यांचे गाव’ म्हणून 'हे' गाव नावारुपास! चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी चिमणीप्रेमींची धडपड

मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : यंत्रांच्या खडखडाटात व सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अस्तित्व विरळ होत असताना देवळा येथील चिमणीप्रेमी व चिमणीमित्र संस्थांच्या सहकार्याने ‘घर तिथे घरटे’ हा उपक्रम राबविला जात आहे. देवळा हे ‘चिमण्यांचे गाव’ म्हणूनही ओळखले जावे यासाठी हे चिमणीप्रेमी कृत्रिम चिमण्यांच्या घरट्यांची संख्या वाढवत पुढाकार घेत आहेत. 

चिमण्यांची घरटी सुरक्षित असल्याची काळजी..
वृक्षतोडीमुळे चिमण्यांची घरटी उद्ध्वस्त होत असून, चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. चिमण्यांना आसरा मिळवून दिल्यास त्यांना आधार मिळेल व त्यांची चिवचिव पुन्हा गुंजेल हा विचार अंगीकारत येथील चिमणीप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते भारत कोठावदे, तसेच इतर चिमणीमित्र नागरिकांनी गेल्या वर्षी ५० चिमण्यांची घरटी बनवून घेत ती परिसरातील घरांच्या बाल्कनीत, कोपऱ्यात तसेच जिथे योग्य जागा असेल तिथे ठेवली. रोज थोडेसे दाणा-पाणी ठेवत चिमण्यांना आश्रय दिल्याने या सर्वच घरट्यांमध्ये चिमण्यांचे वास्तव्य वाढू लागले आहे. चिमण्यांची घरटी सुरक्षित असल्याची काळजी घेतली जाते हेही विशेष! 

दर महिन्यात व्याप्ती वाढविण्याचे नियोजन
गेल्या वर्षी आशापुरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ५० घरटी भेट दिली होती. चिमण्यांचा हा सुखद चिवचिवाट पाहून या संस्थेमार्फत वर्धापन दिनानिमित्त पुन्हा १५१ घरट्यांचे वाटप गुरुवारी (ता. १७) होणार आहे. याबरोबर अमृतकार पतसंस्था व इतरही काही संस्था चिमण्यांचे घरटे देण्यास उत्सुक आहेत. यामुळे लवकरच देवळा गावात ‘घर तिथे घरटे’ हा उपक्रम विस्तारत चिमण्यांचे गाव होण्याकडे जोरदार वाटचाल सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात विठेवाडी रोड, तसेच शिवाजीनगर उपनगरात घरट्यांचे वाटप करत या उपक्रमाचा प्रसार होणार आहे. दर महिन्यात याची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन असल्याचे चिमणीप्रेमी भारत कोठावदे यांनी सांगितले. 
 

पर्यावरण संतुलनासाठी पक्षी संवर्धन महत्त्वाचे आहे. या भागात चिमण्यांसाठी पूरक वातावरण असल्याने ‘थोडे दाणे-थोडे पाणी वाचवू या’ या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता हा उपक्रम हाती घेतला आहे. 
-भारत कोठावदे, देवळा 

लहान मुलांना ओळख होणारा पहिला पक्षी म्हणजे चिऊताई. बालगीतातही चिमणीचा मोठा वाटा आहे. प्रत्येक नागरिकाने घरोघरी घरटी बनवत चिमण्यांना आसरा द्यायला हवा. -प्रा. कमल आहेर-कुवर, देवळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT