नाशिक

Nashik Fraud Crime : बचत संस्थेचे अध्यक्ष, संचालकांकडून ठेवीदारांना 20 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : बचतीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवत बचत संस्थेकडून ठेवीदारांना सुमारे २० लाखास गंडा घातला. अफरातफर करून बचत संस्थेने पोबारा केला. बुधवारी (ता. ८) दुपारी घटना उघडकीस आली.

भद्रकाली पोलिलीस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(depositors were defrauded of 20 lakhs by Savings Bank by pretending to pay interest rate nashik news)

श्रमसंपदा निधी लिमिटेड असे संस्थेचे नाव आहे. तक्रारदार आकाश सोनवणे संस्थेत अल्पबचत प्रतिनिधी (एजंट) म्हणून कार्यरत होते. संस्थेचे विकासक अधिकारी सुधाकर लोंढे यांची जानेवारी २०२२ मध्ये तक्रारदार सोनवणे यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांना संस्थेत रक्कम गुंतवणूक करण्याचे सांगितले.

प्रत्येक सहा महिन्यांस पाच टक्के व्याज देणार असल्याचे आमिष दाखवले. सहा महिन्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे व्याजाची रक्कम परत मिळाली. असे करून त्यांनी तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना संस्थेचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सांगितले. त्या मोबदल्यात ठेवीदारांच्या रकमेवर सात टक्क्याने कमिशन देत वार्षिक १० टक्के देणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार यांनी विविध रकमेचे सुमारे १०० ठेवीदारांची रक्कम संस्थेत गुंतवणूक केली. त्यातील २० जणांना मुदतीत परतावा केला. अन्य ठेवीदारांची मुदत संपूर्णही संस्थेने त्यांच्या रकमेचा परतावा केला नाही. ठेवीदारांनी तक्रारदार प्रतिनिधीकडे रकमेसाठी तगादा लावला. सर्वांची रक्कम देणार असल्याचे सांगत काम सुरू ठेवा, असे सांगितले.

दरम्यान, संस्थेने द्वारका भागातील पौर्णिमा बसस्थानक परिसरातील कार्यालय बंद करून पळ काढला. तक्रारदार यांच्या ८० ठेवीदारांची २० लाख ७८ हजार ३०० रुपये रकमेची अफरातफर केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यास माहिती दिली.

पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कोंडाजी बिन्नर, संचालक विष्णू दिनकर, रामचंद्र भोये, अरुण मालुसरे, कोर कमिटी सदस्य सुधाकर लोंढे, दीपक निकम अशा सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT