rohilya 1.jpg 
नाशिक

रोहिल्याचा डोंगर पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी; झाडे, वन्यप्राणी व पक्ष्यांची अपरिमित जीवितहानी

राम खुर्दळ

गिरणारे/गंगापूर (नाशिक) : रोहिला (ता. त्र्यंबकेश्वर) येथील वनक्षेत्रातील डोंगर अज्ञाताने लावलेल्या आगीत पुन्हा भक्ष्यस्थानी पडला. दर वर्षी या वनक्षेत्रात वणवा लावण्याचे प्रकार घडतात. डोंगरावरील रोपटी, झाडांची, वन्यप्राणी व पक्ष्यांची अपरिमित जीवितहानी झाली आहे. 

रोहिल्याच्या डोंगरावरील वृक्षसंपदा वणव्यात खाक 
दर वर्षी वन विभाग व सामाजिक संस्था डोंगरमाथ्यावर हजारो झाडांचे रोपण करतात. या वनक्षेत्रात गेल्या वर्षी मराठी चित्रपट कलावंतांनी, सामाजिक संस्थांनी याच डोंगरावर वृक्षारोपण केले होते. डोंगरावर अज्ञातांकडून आग लावण्याचे प्रकार घडतात. वनक्षेत्रात आगी लावणारे कोण, हे शोधण्याचे काम वन विभागाचे असून, आजपर्यंत याबद्दल कुठलीही साधी जागृती वन विभाग करीत नसल्याने वने असुरक्षित व जंगलघाट आगीच्या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहे, अशी तक्रारच वनमित्रांनी केली. 

आग लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी 
रोहिल्याच्या वनक्षेत्रात हजारो झाडे दर वर्षी लावली जातात. नैसर्गिक तळे, जलाशये, वनक्षेत्र वणव्यात नष्ट झाल्याने मोठे दुःख होते. पक्ष्यांची पिल्ले, अंडी सगळे जळून गेले. जंगलात वन विभाग संरक्षण देण्यात कमी पडतो. हे दुष्टचक्र सुरू राहिले, तर पर्यावरण संवर्धनाचा हा देखावा उरेल. -विष्णू माळेकर, सामाजिक कार्यकर्ता  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT