tree cutting esakal
नाशिक

वृक्षतोड प्रकरण मिटवून घ्या म्हणणारी ‘ती’ नगरसेविका कोण?

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : वृक्षतोडीस विरोध करण्याऐवजी वृक्षतोड करणाऱ्यांची बाजू घेत प्रकरण जागेवर मिटवून घ्या म्हणणारी ‘ती’ नगरसेविका कोण, अशी चर्चा सध्या कामटवाडे परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. एकीकडे शासन, प्रशासन व वृक्षप्रेमी वृक्षरोपणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत असताना दुसरीकडे कामटवाडे परिसरातील एका ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता २० ते २५ वर्षे जुनी एकूण चार झाडे तोडल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. (Destroyed-cutting-down-25-year-old-trees-nashik-marathi-news)

नागरिकांमध्ये चांगलीच रंगली चर्चा

वृंदावन कॉलनीतील सप्तशृंगी रो-हाउससमोर दिवसाढवळ्या दोन आंब्याची व दोन गुलमोहराची अशी चार झाडे मुळासकट तोडली. वृक्षतोडीस याच परिसरात राहणाऱ्या एका प्रल्हाद नामक वृक्षप्रेमीने कडाडून विरोध केला, परंतु त्यास कोणीही दाद दिली नाही. अखेर त्यांनी या झाडांची लाकडे वाहून येणाऱ्या गाडीसमोर आपले वाहन आडवे करून याबाबत महापालिका व पोलिसांना कळविले व तक्रार केली. महापालिकेचे उद्यान विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे येऊन पंचनामा केला. पोलिसांनी संबंधित वाहन अंबड पोलिस ठाण्यात जमा केले. यास दोन दिवस होऊनही अद्यापपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यावर वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पंचवीस वर्षांची चार झाडे तोडल्याने वृक्षप्रेमींकडून नाराजी

दोन आंब्याची व दोन गुलमोहराची २० ते २५ वर्षांपूर्वीची जुनी झाडे डोळ्यासमोर तोडण्यात आली. विरोध करूनही त्यांनी जुमानले नाही. अखेर महापालिका व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. तेव्हा पंचनामा करून ही गाडी अंबड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. संबंधितांवर वृक्ष प्राधिकरण समितीच्या नव्या नियमानुसार दहा हजार रुपये दंड व गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. -जी. डी. प्रल्हाद

निरीक्षक हांडोरे गैरहजर असल्याने अद्यापपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. गुरुवारी संबंधित वृक्ष तोडणाऱ्यांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आलेला आहे. -प्रशांत परब, निरीक्षक, उद्यान विभाग, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT