Devotees come in great number for Brahmagiri Pradakshina on third Monday nashik news
Devotees come in great number for Brahmagiri Pradakshina on third Monday nashik news  esakal
नाशिक

Nashik Brahmagiri Pradakshina : हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्‍वर; ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अलोट गर्दी..!

अरुण मलाणी

Nashik Brahmagiri Pradakshina : ब्रह्मगिरी पर्वतातील अल्हाददायी वातावरण... हिरव्‍यागार झाडांनी वेढलेले‍ नयनरम्‍य निसर्गाचे सानिध्य अन्‌ ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’चा जयघोष, असे ऊर्जादायी, आनंददायी वातावरण त्र्यंबकनगरीत बघायला मिळाले.

हजारो भाविकांनी रविवारी (ता. ३) सायंकाळपासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरवात केली. प्रदक्षिणेसाठी दिवसभर भाविकांची रीघ कायम राहिली.

प्रचलित प्रथेप्रमाणे श्रावण महिन्‍याच्‍या तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी उत्‍साहात सहभाग नोंदविला. राज्‍यातील विविध शहरांतून विशेषतः ग्रामीण भागातून भाविक फेरीसाठी आले होते. (Devotees come in great number for Brahmagiri Pradakshina on third Monday nashik news)

युवकांचा समूह, महिला मंडळाचा सहभाग लक्षणीय

रविवारपासूनच भाविक दाखल होण्यास सुरवात झाली होती. त्र्यंबकराजाच्‍या चरणी लीन होत, दर्शन घेऊन व कुशावर्तात स्‍नान करून भाविक फेरीसाठी रवाना होत होते.

प्रयागतीर्थाचा प्रदक्षिणा घालत मूळ फेरी मार्गावर भाविक दाखल झाले. हजारो भाविकांनी रात्रभर चालताना ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यशस्वीरीत्या पूर्ण केली. अगदी सुरवातीस असलेला उत्‍साह भाविकांमध्ये समारोपापर्यंत कायम राहिला. दरम्‍यान, अनेक भाविक सोमवारी (ता. ४) सकाळपासून दाखल होत होते.

या भाविकांपैकी काहींनी सायंकाळी उशिरापर्यंत फेरी पूर्ण केली. दरम्‍यान, रात्रीच्‍या वेळी पावसाने दडी दिल्‍याने भाविकांचा हिरमोड झालेला होता. परंतु सकाळी साडेदहाच्‍या सुमारास रिमझिम पावसाला सुरवात झाल्याने दिवसाच्‍या वेळी प्रदक्षिणेसाठी निघालेल्‍या भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाविकांमध्ये अमाप उत्‍साह, संचारली होती ऊर्जा (छायाचित्रे : केशव मते)

खिचडी, केळी अन्‌ लाडूचे वाटप

फेरी मार्गाच्‍या अंतिम टप्प्‍यात थकलेल्‍या भाविकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी सामाजिक संस्‍थांकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये साबूदाणा खिचडीचे वाटप, केळीवाटप यांसह राजगिरा लाडूचे वाटप केले जात होते. भाविकांना ताजेतवाने वाटावे, याकरिता चहाची व्‍यवस्‍था काही संस्‍थांनी केली होती. चालून थकलेल्‍या भाविकांच्‍या पायांची मोफत मालिशदेखील केली जात होती.

‘बम बम भोले’चा गजर

फेरीत सहभागी भाविकांपैकी अनेकांनी आपल्‍यासोबत छोटे स्‍पीकर आणले होते. त्‍यावर ‘बम बम भोले’चा गजर करताना भाविकांचा उत्‍साह वाढविला. अनेक भजनी मंडळांनीही आपल्‍या समूहासह फेरीत सहभाग नोंदविला होता.

देवाच्‍या नामस्‍मरणातून भजन म्हणताना या भाविकांनीही लक्ष वेधले होते. सापगाव फाटा भागात डीजेची व्‍यवस्‍था केलेली होती. थकलेल्‍या भाविकांपैकी अनेकांनी येथे संगीताच्या तालावर ठेका धरताना काहीसा थकवा घालविला.

एक ते दीड किलोमीटरसाठी शंभर रुपयांची मागणी

रात्रभर चालल्‍याने अनेक भाविक मार्गाच्‍या अंतिम टप्प्‍यात थकलेले होते. अशाच परिस्‍थितीचा फायदा घेताना सापगाव फाट्यापासून तर त्र्यंबकेश्‍वर बसस्‍थानक या एक ते दीड किलोमीटरच्‍या अंतरासाठी तब्‍बल शंभर रुपये प्रतिप्रवासी याप्रमाणे काही रिक्षाचालक भाडे आकारत होते. काही युवकांकडून मिळेल त्‍या भाड्यात मोटारसायकलवरून भाविकांनी वाहतूक करत त्‍यांना मदत केली.

महामंडळ, सिटीलिंकच्‍या बसगाड्यांनी वाहतूक

फेरीसाठी एसटी महामंडळातर्फे अडीचशे जादा बसगाड्यांची व्‍यवस्‍था केली होती. याशिवाय शहर बसवाहतूक करणाऱ्या सिटीलिंककडून या मार्गावर जादाच्‍या बसगाड्या सोडल्‍या होत्‍या. त्‍यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी व परतताना भाविकांना दमछाक करावी लागली नाही. लांबपल्ल्‍याच्‍या मार्गावरून अगदी शिवशाही बसगाड्यादेखील त्र्यंबकनगरीत दाखल होत होत्‍या.

त्र्यंबकराजाच्‍या दरबारात लाखो भाविक लीन

प्रदक्षिणेप्रमाणेच त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठीदेखील लाखो भाविक नगरीत दाखल झाले होते. दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी गच्च भरलेला होता. भक्तिभावाने नमन करताना भाविक त्र्यंबकराजाच्‍या चरणी लीन झाले होते. खंबाळ्यापासून खासगी वाहतूक बंद ठेवल्‍याने भाविकांनी एसटी बसने प्रवास करत दर्शनाचा लाभ घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT