devyani nikam.jpg 
नाशिक

ग्रामपंचायत सदस्य ते थेट कर सहाय्यकाचा प्रवास...ध्येयवेड्या महिलेच्या जिद्दीची कहाणी!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सोनज) अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगली होतीच... त्यातच ऑक्टोबर २०१९ मध्ये पार पडलेल्या कर सहाय्यकपदाच्या परीक्षेस सामोरे गेली...अन् आता महिलांमध्ये राज्यात प्रथम येत आपले स्वप्न पूर्ण झाल्याने कष्टाचे चीज झाले, अशी भावना देवयानी निकम यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

ग्रामपंचायत सदस्य ते कर सहाय्यक...

पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण देवयानी निकम यांनी पूर्ण केले. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची झपाटून तयारी सुरू केली. राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.22) रोजी जाहीर झाला. यात मांजरे (ता. मालेगाव) येथील देवयानी निकम महिलांमध्ये राज्यात प्रथम आली. देवयानी खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूलचे कर्मचारी दौलत निकम व काकाणी कन्या विद्यालयाच्या शिक्षिका छाया निकम यांची मुलगी आहे. देवयानी मांजरे ग्रामपंचायतीच्या सदस्यादेखील आहेत. ग्रामपंचायत सदस्य ते कर सहाय्यक हा त्यांचा प्रवास उल्लेखनीय व आदर्शवत आहे. 

यशात पती सचिन पवार यांचादेखील मोठा वाटा

देवयानी यांचे शालेय शिक्षण मालेगाव येथील कां. र. शहा विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण मसगा महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे इंजिनिअरिंग केले. आपल्या यशात आई-वडिलांबरोबरच मुंबई येथे राज्य विक्रीकर अधिकारी असलेले पती सचिन पवार यांचादेखील मोठा वाटा असल्याचे त्या सांगतात. राज्यात प्रथम आल्याने यशासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असल्याचेही देवयानी सांगतात.

निकालाची पर्वा न करता प्रामाणिकपणे अभ्यास करत होते. आई-वडील, पती, सासरची मंडळी यांचे खूप सहकार्य लाभले. भविष्यातदेखील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन वर्ग-१ चा अधिकारी होण्याचा माझा मानस आहे. राज्यात प्रथम आल्याने मनोबल वाढले असून, जबाबदारी वाढली आहे. 
- देवयानी निकम

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT