NMC News  esakal
नाशिक

NMC News : दोष लेखा विभागाचा, भुर्दंड मात्र कर्मचाऱ्यांना!

विक्रांत मते

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी अदा केल्या जाणाऱ्या रकमेत तफावत आढळून आली आहे. संगणक प्रणालीतील दोषामुळे हा प्रकार घडला असून, काही कर्मचाऱ्यांना अधिक तर काही कर्मचाऱ्यांना कमी प्रमाणात रक्कम मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. (difference found in amount paid to NMC employees due to 7th Pay Commission differential Nashik News)

या संदर्भात सीटू संलग्न महापालिका कामगार कर्मचारी संघटनेने निवेदन दिले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. २०१८ पासून वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी अंमलबजावणी २०२१ पासून सुरू आहे. त्यामुळे वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी कर्मचारी कामगार संघटनांकडून केली जात होती.

त्यानुसार पाच हप्त्यांमध्ये फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पहिला हप्त्याची रक्कम अदा केली जात आहे. फरक रक्कम अदा करण्यासाठी लेखा विभागाने संगणकीय प्रणाली तयार केली. वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व संगणकीय प्रणालीमध्ये दर्शनात आलेली रक्कमेत तफावत आढळून आली. काही कर्मचाऱ्यांना ७० ते ८० हजार तर वाहन चालकांना दीड ते दोन लाख रुपयांची फरकाची रक्कम दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली व त्यातून हा प्रकार समोर आला.

लेखा विभागाने प्रचलित पद्धतीने देयके बनवून फरकाच्या योग्य रकमेनुसार कर्मचाऱ्यांना अदा करावी, अशी मागणी सेतू संलग्न कामगार कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष तानाजी जायभावे, सरचिटणीस जगदीश देशमुख, सचिव प्रमोद लहामगे, नाना गांगुर्डे यांची स्वाक्षरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT