Darna Dam esakal
नाशिक

Nashik News : पाणलोटात पावसामुळे दारणातून विसर्ग सुरु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यभर सगळीकडे पाऊस असलातरी नाशिकला अपेक्षित पाऊस नाही. मात्र दारणा धरणाच्या क्षेत्रात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग आजपासून सुरु झाला. (Discharge from Darna dam due to rainfall in watershed nashik news)

दारणा धरण साधारण ७५ टक्के भरल्यानंतर त्यातून नगर आणि त्यानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरु होतो काल दारण धरले. दारणा धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने धरण ७५.८१ टक्के भरले आहे. धरण परिचालन सुचीनुसार धरणामधून येणाऱ्या येव्यानुसार आज (ता.२२) सकाळी अकराला ११०० क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला.

आवश्यकतेनुसार विसर्गात टप्याटप्याने वाढ करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दारणा धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे दारणा धरणातून विसर्गाला सुरवात झाल्याने धरणाच्या खालच्या भागातील नागरिकांना समाधानाचे वातावरण आहे. राज्यात जुलै महिन्याच्या सरासरी इतका पाऊस झाला असला तरी, नाशिक मात्र अपवाद आहे. जिल्ह्यात दारणा धरण वगळता बहुतांश प्रमुख धरणातील साठा पन्नास टक्केपेक्षा कमीच आहे.

त्यात चणकापूर ४४, केळझर ४८ गंगापूर ४७ भाम ४७ टक्के आहे तर इतर लहान धरणातील पाण्याची स्थिती याहून बिकट असून जेमतेम तीस टक्के धरण भरली आहे. वालदेवी २३, कश्यपी २५, गौतमी २६, कडवा ३२, भोजापूर ९, पालखेड ३६, करंजवण २७, ओझरखेड २५, वाघाड २२, पुणेगाव २६ इतकाच पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २८ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT