The discharge was released from the dam on Tuesday evening.  esakal
नाशिक

Nandur Madhyameshwar Dam : नांदूरमध्यमेश्वर धरणातून 7 हजार 190 क्यूसेक्सचा विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

Nandur Madhyameshwar Dam : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे नांदूरमध्यमेश्‍वर धरणातील साठा वाढला असून, मंगळवारी (ता. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास धरणातून सात हजार १९० क्यूसेक्स वेगाने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे गोदावरीचे पात्र खळखळल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Discharge of 7 thousand 190 cusecs from Nandur Madhyameshwar Dam nashik news)

दारणा धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मंगळवारी निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग करण्यात आला.

जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यांत झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पाणी आल्याने नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून गोदावरी नदीत ‘जायकवाडी’च्या दिशेने सात हजार १९० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणाखालच्या कोरड्या असलेल्या बंधाऱ्यांना संजीवनीच मिळेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे निफाड तालुक्यात सर्वत्र पुनरागमन झाले आहे. यामुळे मका, सोयाबीनसह पिकांना फायदा होईल.

तालुक्यात जवळपास सर्वच भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस व्हावा, यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून उभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT