Taluka President Mahendra Borse while giving information about the drought in Nandgaon taluka to party president Sharad Pawar, MP Supriya Sule, Jayant Patil  esakal
नाशिक

Nashik News : नांदगावच्या दुष्काळाची राष्ट्रवादीकडून दखल; पक्षाध्यक्ष शरद पवारांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुष्काळ जाहीर करावा ही दुर्दैवी मागणी जनता हौस म्हणून करत नसते, दुष्काळ जाहीर होण्यासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती व शास्त्रीय निकष या सर्व बाबींमध्ये नांदगाव तालुका तंतोतंत बसत असतानाही शासनाने ट्रिगर- २ अंतर्गत नांदगावचा समावेश केला नाही ही बाब मुंबई येथे  तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली.

कांदा अनुदान, शेतीमालाचे घसरलेले भाव, निर्यातशुल्क, जीवनावश्यक वस्तूंची महागाई ह्या प्रश्नावर चर्चा करून जनतेला न्याय मिळावा असे गाऱ्हाणेही त्यांच्याकडे मांडले. (Discussion with party president Sharad Pawar regarding drought of Nandgaon from NCP nashik news)

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सादरीकरण केले.

त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांना टॅग करीत ट्विट केले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदगावच्या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त करीत शासनस्तरावर सर्वोतपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.

दुष्काळाबाबत नांदगाव तालुका राष्ट्रवादीकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुष्काळासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी तातडीने ट्विट केले व नांदगावच्या दुष्काळाबाबत संसदेत आवाज उठविला जाईल असे पक्षाच्या तालुक्यातील शिष्टमंडळाला आश्वासित केले.

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याला वगळण्यात आले आहे. अवर्षणामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करून घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या ट्विटद्वारे केली.

राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, हेमंत टकले, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सलक्षणा सलगर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह अनिल वाघ, नीलेश चव्हाण, मच्छिंद्र वाघ, अशोक निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT