chhagan bh.jpg 
नाशिक

"नाशिकमध्ये २५ मार्चपासून जिल्हाबंदी.. ३१ मार्चपर्यंत घरातच राहा!"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत घरातच राहणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमधून बाहेर किंवा बाहेरच्यांना जिल्ह्यात येण्यास पूर्णपणे प्रतिबंध

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आणि बाहेरच्या नागरिकांना नाशिकमधून बाहेर किंवा बाहेरच्यांना जिल्ह्यात येण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येणार आहे. तसेच शासन आदेशानुसार रिक्षात चालकाव्यतिरिक्त केवळ एक प्रवासी, तर कारमध्ये केवळ दोन प्रवाशांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता किरकोळ कारणांसाठी शहरात फिरणाºया वाहने व लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही भुजबळ म्हणाले.

पेट्रोल पंप हे सकाळी ८ ते ५ या वेळेतच सुरू

पेट्रोल पंपांवर दुचाकींना एकावेळी १०० रुपये, तर चारचाकींना केवळ १००० रुपयांचे पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले असून पेट्रोल पंप हे सकाळी ८ ते ५ या वेळेतच सुरू ठेवले जातील. धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर उपस्थित होते.जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणारअन्न, धान्य, भाजीपाला, मेडिकल या सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. जनतेने केवळ तिथे गर्दी करू नये. बाजार समितीत तसेच भाजीपाला विक्रीसाठी जागा निश्चित करून भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

Kedarnath Tourism: मुंबईहून केदारनाथपर्यंत ट्रिप प्लॅन करताय? मग सर्व मार्ग आणि टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT