Jalaj Sharma esakal
नाशिक

Nashik Onion News : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची चौकशी; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे तहसीलदारांना आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : कांद्याचे दर टिकून राहण्यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांना खरेदीचे आदेश दिलेले असताना त्यांच्या खरेदीची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तहसीलदारांना दिले.

या चौकशीच्या आडून आता थेट व्यापाऱ्यांवर निशाणा साधला जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.(District Collector Jalaj Sharma orders Tehsildar to inquire into purchase of onion by NAFED NCCF nashik news)

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तरी हे व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने शेतकऱ्यांचा कांदा सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत मूल्यानुसार अर्थात, प्रतिक्विंटल दोन हजार ४०० रुपयांनीच खरेदी करणे आवश्यक आहे.

पण असे असताना ‘एनसीसीएफ’ने आपली खरेदी केंद्र नेमकी कुठे आहेत, याबाबत अपेक्षित प्रसिद्धी केलीच नाही. ‘नाफेड’ने प्रसिद्धी केली असली तरीही प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर त्याचे विशेष परिणाम दिसत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून होत आहे. व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यात आल्याचे आरोपही केले जात आहेत.

त्यामुळे आता जिल्हाधिकाऱीरी जलज शर्मा यांनी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने किती कांदा खरेदी केला. कोणाकडून खरेदी केला. त्याला दर किती दिला, अशा सर्वच बाबींची तपासणी केली जाईल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांना आदेश देत तत्काळ हा विषय निकाली काढला जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांनी कांदा कुठे खरेदी केला, याच्या चौकशीचे आदेश दिलेले असले तरी त्याला राजकीय किनार फार मोठ्या प्रमाणात आहे. नेत्यांशी निगडित कार्यकर्त्यांकडूनच कांद्याची खरेदी झालेली दिसते. त्यामुळे या चौकशीतून फार काही निष्पन्न होईल, अशी अपेक्षा नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT