Electricity cut off  esakal
नाशिक

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांचा 21 तास वीज खंडितचा आदेश; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

जिल्हाधिकाऱ्यांच्या एकवीस तास वीज खंडितच्या आदेशाने निफाड, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हाधिकाऱ्यांच्या एकवीस तास वीज खंडितच्या आदेशाने निफाड, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पालखेड डाव्या कालव्याला शेतीसिंचन व पाणीपुरवठा योजनांसाठी आवर्तन सोडले आहे.

पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी निफाड, येवला व दिंडोरी तालुक्यातील ६५ गावांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. (District Collector order 21 hours power cut nashik news)

दुष्काळामुळे अगोदर खरीप वाया गेला आहे. गारपिटीने द्राक्षशेती उद्‍ध्वस्त झाली. रब्बी हंगामाचे नुकसान झाले असताना तीनही तालुक्यातील शेतकरी संकटाला सामोरे जात आहेत. नैसर्गिक संकटातून वाचलेली द्राक्षे कशी वाचायची? कांदा लागवड कशी करायची? बागांवर फवारणी कशी करायची? असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पालखेड धरणातून डाव्या कालव्यावरील गावांमध्ये सिंचन आणि पाणीपुरवठा योजनेला आवर्तन सोडण्यासाठी २० जानेवारी २०२४ पर्यंत २१ तास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. आवर्तनातील शेवटच्या गावांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असेल. अभिसरणासाठी निर्दिष्ट केल्याप्रमाणे पाणी परिसंचरण सोडले पाहिजे, अधिक पाणी अभिसरण सोडू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

वीजपुरवठा खंडित होणारी गावे

० दिंडोरी तालुका : जोपूळ, लोखंडेवाडी व चिंचखेड आदी.

० निफाड तालुका : मौजे उंबरखेड, पिंपळगाव बुद्रुक, आहेरगाव, लोणवाडी, पालखेड मिरचीचे, कारसूळ, डावचवाडी, देवपूर, पंचकेश्‍वर, रौळसपिंप्री, उगाव, खेडे, शिवडी, नांदुर्डी, रानवड, ब्राम्हणगाव, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सारोळेगाव, कोंडीगाव, सोनेवाडी बुद्रुक, रामपूर, नैताळे, बोकाडदरा, धरणगावखडक, धरणगाववीर, डोंगरगाव, विष्णूनगर, हनुमाननगर, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, कोटमगाव, लासलगाव, मरळगोई खुर्द, मरळगोई बुद्रुक, गोंदेगाव, शिवापूर, पाचोरा बुद्रुक, पाचोरा खुर्द आदी.

० येवला तालुका : मौजे मानोरी बुद्रुक, देशमाने बुद्रुक, मुखेड, सोमठाणे, जळगाव (ने), निलखेडे, लौकी, शिरसगाव, वलदगाव, पाटोदा, दहेगाव, ठाणगाव, पिंपरी, मुरमी, आडगाव, धुळगाव, अंतरवेली, धानोरे, नांदूर, बाभुळगाव खुर्द, बाभूळगाव बुद्रुक, बाल्हेगाव, भाटगाव, नगरसूल, धामणगाव, सायगाव व अंदरसूल आदी.

"नैसर्गिक संकटांना अगोदर सामोरे जात असताना ६५ गावांमध्ये २१ तास वीजपुरवठा खंडितचा निर्णय हा जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात येईल." - राजेंद्र बोरगुडे, संचालक, लासलगाव बाजार समिती

"गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्यामागे संकटाचे शुक्लकाष्ट संपवायचे नाव घेत नाही. अशात, २४ तासांतील तीन तास वीज मिळणार असल्याने द्राक्षबागा कशा वाचवायच्या? फवारणी कशी करायची? शेतीचे काम कसे करायचे? असे प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. दररोज ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष शेती अवघड बनली आहे. वीजपुरवठा खंडितच्या निर्णयामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडतील." - ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ (नाशिक विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT