corona-1.jpg 
नाशिक

जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह संख्येत ४६ ने घट; तर 1 हजार ७३० बाधितांवर उपचार सुरू

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अनेक दिवसांनंतर कोरोनाबाधितांपैकी बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या अधिक राहिली. ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत किरकोळ घट झाली आहे. मंगळवारी (ता. ५) दिवसभरात १९२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या २३५ होती. तीन रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ४६ ने घट झाली असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत एक हजार ७३० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

एक हजार ७३० बाधितांवर उपचार सुरु

मंगळवारी (ता. ५) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १३२, नाशिक ग्रामीणमधील ५३, मालेगावचे तीन, तर जिल्ह्याबाहेरील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १६०, नाशिक ग्रामीणमध्ये ६८, मालेगावचे दोन, जिल्ह्याबाहेरील पाच रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तीन मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन, तर नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे. चांदवड येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्‍यू झाला. शहरात जुने नाशिक भागातील ६५ वर्षीय महिला, पंचवटीतील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्‍यू झाला आहे. 

आतापर्यंत एक हजार ९९१ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू

दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ९५१, नाशिक ग्रामीणला २३, मालेगावला पाच, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन, जिल्‍हा रुग्णालयात सहा संशयित दाखल झाले आहेत. जिल्ह्या‍तील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ११ हजार २६४ वर पोचला असून, यांपैकी एक लाख सात हजार ५४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ९९१ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झालेला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

SCROLL FOR NEXT