Dada Bhuse news
Dada Bhuse news esakal
नाशिक

Nashik: इंग्रजी शाळांच्या धर्तीवर जि. प. मॉडेल स्कूलमध्ये सुविधा; विद्यार्थ्यांशी भुसे यांनी सांधला संवाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकास योजनेच्या धर्तीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या १२६ शाळांचा आदर्श शाळांचा विकास होत आहे. मिशन मॉडेल स्कूल अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये असणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलमध्ये पुरविल्या जाणार आहे.

या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब परंतु होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (District on lines of English schools Facilities at zp Model School Bhuse interacted with students Nashik news)

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जि.प. च्या वतीने साकारण्यात येणाऱ्या १२६ मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी सोमवारी (ता.२४) पालकमंत्री भुसे यांनी संवाद साधला.

यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, युनिसेफचे राज्य समन्वयक संदीप तेंडुलकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, नाशिक शहर पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, मॉडेल स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते.

मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण, कला, क्रीडा या विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योगा, चिंतन, रोबोटिक्स, संगणक, बसायचे अद्ययावत बाक या आधुनिक साधनांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगत, या कामात शाळा व्यवस्थापन समित्या, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, दानशूर व्यक्ती यांच्या सहभागातून या शाळांचा विकास हा जिल्हा परिषदेने करावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

श्री. तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक शिकवले. डॉ. बागूल हे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी हे देखील सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांनी आभार मानले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उन्हाळी सुट्यांमध्ये पाच उपक्रम

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी उन्हाळी सुट्यांमध्ये विद्यार्थांनी खेळासोबतच इंग्रजी शब्द समूहांचा संचय करावा, या हेतूने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांनी सुटीच्या दिवसांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ, भारताचा बहुआयामी नकाशा तयार करणे, जगाच्या नकाशावर ३० देश दर्शविणे, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बाजरी, नाचणी, ज्वारीची भाकरी बनविणे, गव्हाची चपाती बनविणे, ठेचा, ऑम्लेट, चटणी बनविणे, ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी घरातील प्रौढ निरक्षर, आपल्या घराशेजारील प्रौढ निरक्षरांना साक्षर बनविणे आदी ५ उपक्रम राबविले जाणार आहे. यात उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना बक्षीसे दिले जातील, असे मित्तल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

Latest Marathi News Live Update : इगतपुरीच्या भावली धरणात 5 जणांचा बुडून दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT