Sachin Patil & Sanjay Barkund
Sachin Patil & Sanjay Barkund esakal
नाशिक

Nashik : District SP सचिन पाटील यांची अखेर बदली; DCP बारकुंड धुळ्याचे SP

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर आज पूर्णविराम मिळाला. औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी पाटील यांची बदली झाली असून, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांची धुळ्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली.

राज्यातील एकूण ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात २४ अधिकाऱ्यांना पदस्थापना, तर १९ अधिकाऱ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. (District SP Sachin Patil finally transferred DCP Borkund become Dhule SP Nashik Latest Marathi News)

गृह विभागामार्फत गुरुवारी (ता. २०) रात्री महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बहुचर्चित नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचा समावेश असून, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांची धुळे येथे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. ओला नागपूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक होते.

या अधिकाऱ्यांची पदस्थापना न करता बदली

जळगावचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह १९ अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. परंतु त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही. तर, २४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊन त्यांची नव्याने पदस्थापना करण्यात आली आहे.

यात, पवन बनसोड, बसवराज तेली, समीर शेख, अंकित गोयल, शिरीष सरदेशपांडे, राकेश ओला, एम. राजकुमार, श्रीमती रागसुदा आर., संदीपसिंह गील, श्रीकृष्ण कोकाटे, सोमय विनायक मुंडे, सारंग आवाड, गौरव सिंह, संदीप घुगे, रवींद्रसिंग परदेशी, नुरूल हसन, निखिल पिंगळे, नीलोत्पल, संजय बारकुंड, श्रीकांत परोपकारी, सचिन पाटील, लक्ष्मीकांत पाटील, पराग मणेरे यांचा समावेश आहे.

शहाजी उमप आज पदभार स्वीकारणार

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीबाबत दोन-तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदरच त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बदलीविरोधात श्री पाटील ‘कॅट’मध्ये गेले होते.

‘कॅट’ने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. मात्र त्याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी ‘कॅट’ने निकाल देत ही स्थगिती उठविली आणि चार आठवड्यांत अधीक्षक पाटील यांची बदली करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे सर्वांचे त्यांच्या बदलीकडे लक्ष लागून होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक शहाजी उमप शुक्रवारी (ता. २१) दुपारी पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT